Know the young man who is hit by the eyes of her eyes and wounded by the shame of the young women? | तिच्या आँखो की गुस्ताखियाँवर फिदा झालेला आणि तरुणींना लाजण्याने घायाळ करणारा तो तरुण कोण,जाणून घ्या?

देशभरातील आणि सोशल मीडियावरील तरुणांना सध्या तिने वेड लावले आहे.तिच्या नजरेने कित्येक तरुण क्लीन बोल्ड झालेत.प्रत्येकाच्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावरील टाइम लाईनवर ती धुमाकूळ घालतेय.आँखो की गुस्ताखियाँ आणि तेरे नैना… अशा गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या ओठावर रुंझी घालतायत.मात्र या सगळ्या तरुणांआधी त्या व्हिडीओतील तरुणीनं त्या व्हिडीओतल्या तरुणाला आपल्या नजरेने घायाळ केले आहे. मनिक्य मलरया पूवी हा व्हिडिओ 'उरू अदार लव' या मल्याळम सिनेमातला आहे.सगळीकडे त्या व्हिडीओतील प्रिया वरियरची चर्चा असली तरी तो तरुण कोण जो तिच्यावर लट्टू झाला आहे हे फारसं कुणाला माहिती नाही.आपल्या लाजण्याने या तरुणाने कित्येक तरुणींना बोल्ड केले आहे.प्रिया आणि त्या तरुणाची नजरानजर आणि हसून एकमेकांकडे पाहणे अनेकांना जुन्या आठवणीत घेऊन गेले आहे.प्रिया तर सगळ्यांनाच माहिती झाली आहे.मात्र तरुणींना घायाळ करणा-या त्या तरुणाची क्रेझही काही कमी नाही.त्या तरुणाचे नाव मोहम्मद रोशन उर्फ रोशन अब्दुल रहुफ असं आहे. सोशल मीडियावर मोहम्मद रोशन हा तरूण अभिनेता बराच सक्रीय आहे.त्याने सोशल मीडियावर अनेक कॉमेडी व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. उरू अदार लव या सिनेमात तो प्रियाचा को-स्टार आहे.मोहम्मद रोशन हा एक उत्तम थिएटर अभिनेता आहे.त्याने आजवर स्टेजवर अनेक लक्षवेधी परफॉर्मन्स दिले आहेत. 'डी-3' या रिअॅलिटी शोमध्ये धमाकेदार परफॉर्मन्ससाठी त्याला अभिनेत्री शोभना यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.उत्तम अभिनेता असणारा मोहम्मद रोशन हा उत्तम डान्सर आणि गायकही आहे.प्रिया आणि त्याची भूमिका असलेला 'उरू अदार लव' हा सिनेमा 3 मार्चला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Also Read:पाहा,इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या प्रिया प्रकाश वारियरचे काही ‘खल्लास’ करणारे फोटो!

व्हॅलेन्टाईन वीकमुळे सगळे वातावरण रोमॅन्टिक झाले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या वातावरणाला आणखी रोमॅन्टिक करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील एका चेह-याने अख्खा सोशल मीडियाला वेड लावले आहे. हा चेहरा आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा.अनेकांना घायाळ करणा-या याच प्रिया प्रकाश वारियरचे आणखी काही सुंदर फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोमधील प्रियाचा अंदाजही खल्लास करणारा आहे. तिचे हास्यही तितकेच मनमोहक आहे.तिचे काही ग्लॅमरस फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Web Title: Know the young man who is hit by the eyes of her eyes and wounded by the shame of the young women?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.