Know where and when Javed Akhtar and Shabana Azmi first visit | ​जाणून घ्या कुठे आणि कधी झाली होती जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची पहिली भेट

शबाना आझमी यांनी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखकांमध्ये जावेद अख्तर यांची गणना केली जाते. जावेद आणि शबाना यांच्या लग्नाला आता अनेक वर्षं झाली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. सीता और गीता या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात जावेद यांना बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळाले नव्हते. पण जंजीर या चित्रपटानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली. जावेद यांनी खूपच कमी वयात यश मिळवले. जावेद यांच्या कवितांवर तर सगळेच फिदा असायचे. जावेद यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले आहे. त्यांनी म्हटले होते की, प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांना माझ्या कविता, शायरी ऐकवण्यासाठी मी त्यांच्या घरी अनेकवेळा जात असे. कैफी यांची मुलगी शबाना त्या काळात खूपच वेगळ्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत होती. शबानाला मी सगळ्यात पहिल्यांदा तिच्याच घरी भेटलो होतो. 
शबाना आणि जावेद यांची ओळख झाली, त्यावेळी त्यांचे हनी यांच्यासोबत लग्न झाले होते. जावेद यांचे लग्न झाले असल्यामुळे शबाना त्यांच्यापासून दूरच राहायची. पण एका पार्टीत शबानाच्या स्पर्श या चित्रपटातील भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्या दिवसापासून त्यांच्यात संभाषणाला सुरुवात झाली. काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हनी यांच्या कानावर ही गोष्ट पोहोचताच घरात रोज भांडणे व्हायला लागली. पण जावेद आता आपल्यावर प्रेम करत नाहीत याची हनी यांना जाणीव झाल्याने त्यांनी जावेद यांना शबानाकडे जायला सांगितले. लग्नाच्या सातच वर्षांत हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतला. हनीसोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच जावेद आणि शबाना यांनी लग्न केले. 

Also Read : ​या कारणामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटाचे लिखाण करायला जावेद अख्तर यांनी दिला होता नकार
Web Title: Know where and when Javed Akhtar and Shabana Azmi first visit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.