अबोली कुलकर्णी

बॉलिवूड म्हणजे मायानगरी. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी एका संधीची कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. त्या एका संधीसाठी कलाकार अहोरात्र झटतात.  त्यासाठी त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आवडीनिवडी सर्वांनाच मुरड घालावी लागते. मात्र, असे बरेच कलाकार आहेत जे आज याचप्रकारच्या स्ट्रगलमधून जाऊन बॉलिवूडचे टॉपचे स्टार्स झालेत. आता ते त्यांच्या आवडीनिवडी नक्कीच जपू शकतात. ‘बी-टाऊन’ मध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांच्या आवडीनिवडी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. घेऊयात अशाच काही कलाकारांचा आढावा....* सलमान खान
‘बॉलिवूडचा दबंग स्टार’ सलमान खान याला वेगवेगळया प्रकारच्या सुगंधी साबणांचा संग्रह करण्याची आवड आहे. हॅण्डमेड, डिझायनर आणि हर्बल प्रकारच्या साबणांचे कलेक्शन तो करत असतो. असे म्हणतात की, तो सेटवर शूटिंग करत असेल तर त्याने वापरलेल्या साबणाच्या वासानेच त्याचे अस्तित्व इतरांना जाणवते. 
                  

* सुष्मिता सेन
विविध प्रकारच्या सापांचे जतन करण्याचा आगळावेगळा पण विचित्र छंद सुष्मिता सेनचा आहे. तिच्या घरी ‘पायथॉन’ या नावाचा साप तिने पाळला असून अजून एक तिची विचित्र आवड म्हणजे ओपन टेरेसमध्ये बाथ टब ठेवून अंघोळ करायला तिला आवडते. 

                  

* राणी मुखर्जी
‘गुलाम गर्ल’ राणी मुखर्जी ही चेन स्मोकर असून ती या व्यसनाच्या खूप आहारी गेली आहे, असे कळतेय. ती सकाळी उठल्यापासूनच स्मोकिंग करायला सुरूवात करते. दिवसभरांत ती अनेकदा स्मोकिंग करते, हे तिला देखील लक्षात येत नाही. 

                  

* शाहरूख खान
‘बॉलिवूडचा किंग खान’ शाहरूख याला तो जेवण करत असताना कधीही सेल्फी घेण्यासाठी इन्व्हाईट केलेले त्याला आवडत नाही. त्याला आईस्क्रीम देखील आवडत नाही. पण, होय त्याला गॅझेटस आणि व्हिडीओ गेम्स खूप आवडतात. त्याने त्याच्या ‘मन्नत’ या घरी एक रूम केवळ गॅझेटस आणि व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठीच तयार केली आहे. तो तिथे त्याच्या मित्रमंडळींना खेळायला देखील बोलावतो. 

                   

* अमिताभ बच्चन
 ‘बॉलिवूडचे महानायक’ म्हटल्यावर युनिक आवडीनिवडी तर असणारच. आता हेच पाहा ना, त्यांना दोन्ही हातांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहीता येते. ‘कूली’ चित्रपटावेळी अमिताभ बच्चन यांच्या झालेल्या अपघातामुळे त्यांचा उजवा हात थोडासा अस्थिर झाला. मात्र, तरीही ते अभिषेक आणि ऐश्वर्या परदेशात असताना दोन्ही हातात घडयाळ घालतात. एक भारतीय वेळेनुसार आणि दुसरे परदेशातील वेळेनुसार...

* विद्या बालन
‘बॉलिवूडची उलाला गर्ल’ म्हणजेच विद्या बालन हिच्याकडे जवळपास ८०० साड्या असतील. ती साडी नेसूनच झोपत असते. ती तिच्या कपड्यांबद्दल खूप कॉन्शियस असते. शाळेत असल्याप्रमाणे तिच्या सगळ्या सवयी आहेत. तिला मोबाईल सांभाळणे आवडत नाही. त्यामुळे तिला येणारे अनेक कॉल्स देखील समजत नाहीत. 
Web Title: Know, 'these' are funny personal favorites of celebrities!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.