हम को हमीं से चुरा लो...! किम शर्माला सोसवेना क्षणाचाही दुरावा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 04:07 PM2019-01-13T16:07:50+5:302019-01-13T16:09:04+5:30

‘मोहब्बतें’ आणि ‘तुमसे अच्छा कौन है’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी किम शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण लव्ह लाईफमुळे मात्र किम सध्या जाम चर्चा आहे. होय, अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे रिलेशनशिप जगजाहिर झालेय आणि आता हर्षवर्धनशिवाय एक क्षणही एकटे राहणे किमला जड जातेय.

kim sharma spotted kissing harshvardhan rane at the airport | हम को हमीं से चुरा लो...! किम शर्माला सोसवेना क्षणाचाही दुरावा...!!

हम को हमीं से चुरा लो...! किम शर्माला सोसवेना क्षणाचाही दुरावा...!!

ठळक मुद्दे एअरपोर्टवरून एकमेकांचा निरोप घेताना किम इतकी भावूक झाली की, तिने कुणाचीही, कशाचीही पर्वा न करता थेट हर्षवर्धनला घट्ट मिठी मारली. केवळ इतकेच नाही तर सगळ्यासमोर हर्षवर्धनला किस केले.

‘मोहब्बतें’ आणि ‘तुमसे अच्छा कौन है’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी किम शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण लव्ह लाईफमुळे मात्र किम सध्या जाम चर्चा आहे. होय, अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे रिलेशनशिप जगजाहिर झालेय आणि आता हर्षवर्धनशिवाय एक क्षणही एकटे राहणे किमला जड जातेय.
होय, अलीकडे हर्षवर्धन आणि किम या दोघांना एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. पण एअरपोर्टवरून एकमेकांचा निरोप घेताना किम इतकी भावूक झाली की, तिने कुणाचीही, कशाचीही पर्वा न करता थेट हर्षवर्धनला घट्ट मिठी मारली. केवळ इतकेच नाही तर सगळ्यासमोर हर्षवर्धनला किस केले. हर्षवर्धन क्षणभरही दूर जाऊ नये, या किमच्या भावना कुणापासूनही लपल्या नाहीत. हर्षवर्धनने कसेबसे किमला सावरले आणि मग दोघेही आपआपल्या मार्गाने चालते झालेत.

अलीकडे एका मुलाखतीत किमने ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. मी खूप ओपन आहे. मला काहीही लपवता येत नाही. निश्चितपणे मी रिलेशनशिपमध्ये आहे. जे काही आहे, ते जगजाहिर आहे. कुणापासून काहीही लपलेले नाही, असे किम यावेळी म्हणाली होती. मी खूप लहान असताना घरातून पळून आले होते. सायबर कॅफे व एसटीडी बूथूमध्ये काम करून मी इथपर्यंत पोहोचले. या प्रवासात माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे ती म्हणाली होती.

नुकताच हर्षवर्धनचा वाढदिवस साजरा झाला. हर्षवर्धनला विश करताना किमने त्याच्यासोबत फोटो शेअर केला होता. शिवाय हॅपी बर्थ डे बेबी, चमकत राहा, असे कॅप्शन या फोटोला दिले होते. तिच्या या पोस्टवरूनच सगळे काही स्पष्ट झाले होते.
एकंदर काय तर किम काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाही. कदाचित हर्षवर्धनचीही याच मूडचा आहे. मग काय, सगळेच खुल्लम खुल्ला...!!
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. किम शर्मा तर कधीचीच बॉलिवूडमधून गायब झाली आहे. ‘मोहोब्बते’, ‘नहले पे दहला’, ‘मनी है तो हनी है’, ‘कुडियों का है जमाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली किम काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली.

Web Title: kim sharma spotted kissing harshvardhan rane at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.