Khilji 'khilji' shocked by 'Padmavati' controversy! Change to become 'Simba' !! | ​‘पद्मावती’ वादाने दुखावलेल्या ‘खिल्जी’ने अंगावर चढवली खाकी! ‘सिम्बा’ बनून घेणार बदला!!

‘गोलमाल रिटर्न्स’ सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टी एक नवा कोरा चित्रपट घेऊन येतो आहे आणि यात तुमचा आमचा लाडका रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. ‘सिम्बा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आज या चित्रपटाचे टीजर पोस्टर रिलीज झाले. यात रणवीर एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसतो आहे. पोस्टरवर ‘संग्राम भालेराव’ असे लिहिले आहे. म्हणजेच रणवीर या चित्रपटात संग्राम भालेवार नामक पात्र साकारणार आहे. ‘सिम्बा’चे पोस्टर पाहून एक गोष्ट उघड झालीय, ते म्हणजे यातील पोलिस बराच ‘रंगीन’ असणार आहे. चाहत्यांना ‘सिम्बा’चे पोस्टर चांगलेच आवडले आहे. याचा पुरावा म्हणजे,घोषणा होताच  ‘सिम्बा’ सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागला आहे.करण जोहर आणि रोहित शेट्टी हे दोघे मिळून हा चित्रपट साकारणार आहेत. पुढीलवर्षी २८ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. म्हणजेच, या चित्रपटाला ख्रिसमससोबतच नव्या वर्षाचाही फायदा मिळणार आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘टेम्पर’मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल लीड रोलमध्ये होते. ‘सिम्बा’मध्ये ज्युनिअर एनटीआरची जागा रणवीर घेणार आहे. चित्रपटाची हिरोईन मात्र अद्याप फायनल झालेली नाही. सध्या अनेक अभिनेत्रींची नावे या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.   यापैकी रणवीरच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते लवकरच कळेल. तोपर्यंत या चित्रपटाचे टीजर पोस्टर तुम्ही पाहायला हवे आणि ते कसे वाटले, हेही आम्हाला कळवायला हवे.

ALSO READ : रणवीर सिंगवर नाराज आहेत संजय लीला भन्साळी! कारण वाचून बसेल धक्का!!

 रणवीरने नुकताच ‘पद्मावती’ हा चित्रपट हातावेगळा केला. यात रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर प्रथमच निगेटीव्ह रोलमध्ये दिसेल. तूर्तास रणवीरचा हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. ‘पद्मावती’नंतर रणवीर लगेच ‘गली ब्वॉय’मध्ये बिझी झाला. या चित्रपटात तो रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासोबतच रणवीर ‘सिम्बा’चे शूटींग सुरु करणार आहे.
Web Title: Khilji 'khilji' shocked by 'Padmavati' controversy! Change to become 'Simba' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.