अक्षय कुमारने असे लढले ‘केसरी’तील युद्ध! पाहा, ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:01 AM2019-03-13T11:01:12+5:302019-03-13T11:01:58+5:30

दमदार ट्रेलरनंतर ‘केसरी’च्या मेकर्सनी आता या चित्रपटाचा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.

kesari making video shared by akshay kumar on social media | अक्षय कुमारने असे लढले ‘केसरी’तील युद्ध! पाहा, ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!!

अक्षय कुमारने असे लढले ‘केसरी’तील युद्ध! पाहा, ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देसन १८९७ मध्ये सारागढीचे युद्ध झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी लढणा-या ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या शौर्याची ओळख करून दिली होती.

१८९७ साली झालेल्या सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित असलेला ‘केसरी’ हा पीरियड ड्रामा येत्या २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. अक्षय यात ईशर सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमधील अनेक युद्ध  प्रसंग व अक्षयच्या तोंडचे संवाद अक्षरश: अंगावर शहारे आणतात. या दमदार ट्रेलरनंतर ‘केसरी’च्या मेकर्सनी आता या चित्रपटाचा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.


चित्रपटातील सर्वात शानदार अ‍ॅक्शन सीन्स कसे चित्रीत केले गेले, ते या व्हिडीओत पाहायल मिळतेय. चित्रपटात दोन अ‍ॅक्शन सीक्वेन्स आहेत, यापैकी एक हिमाचल प्रदेशात शूट करण्यात आला आहे तर दुसरा मुंबईतील वाई येथे. सारागढीचे युद्ध १८९७ मध्ये लढले गेले होते. त्यामुळे पडद्यावर हे युद्ध दाखवण्यासाठी त्या काळातील युद्धाची कला, युद्धातील प्राचीन शस्त्रास्त्र या सगळ्यांवर विशेष मेहनत करण्यात आली. त्याकाळात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती. ३ नॉट ३ बंदूक असायची. या बंदुकीतून एक गोळी फायर केल्यानंतर दुसरी गोळी लोड करावी लागायची. याशिवाय धारदार आणि वजनी शस्त्रांस्त्रांनीच युद्ध लढली जात. डोक्यावर जड अशी पगडी घालून हे अ‍ॅक्शन सीन्स करणे अक्षयसाठी निश्चितच सोपे नव्हते.
‘केसरी’च्या अ‍ॅक्शन डायरेक्टरचे मानाल तर, या चित्रपटाचा क्लायमॅक्स चित्रीत करणे सर्वाधिक मोठे आव्हान होते. एकटा अक्षय हजारो शत्रूंचा सामना करतो, तो चित्रपटातील सीन सर्वांत सुंदर असल्याचे अ‍ॅक्शन डायरेक्टरने सांगितले.

सन १८९७ मध्ये सारागढीचे युद्ध झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी लढणा-या ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या शौर्याची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंगने १० हजार अफगाणी सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसºया वेळेस त्याचा पराभव झाला पण  ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते.  

Web Title: kesari making video shared by akshay kumar on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.