Katrina Kaif's sister showed color before entering Bollywood! | बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदरच कॅटरिना कैफच्या बहिणीने दाखविला रंग!

बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात काम करून कॅटरिना कैफचे नशीब पुन्हा एकदा चमकले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण गेल्या काही काळापासून ती सातत्याने अपयशाचा सामना करीत होती. अशात या चित्रपटाच्या यशाने तिला पुन्हा एकदा यशाच्या ट्रॅकवर आणले आहे. शिवाय तीनशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवून दिले आहे. दरम्यान, कॅटला यशाच्या ट्रॅकवर आणून सोडल्यानंतर सलमान तिची बहीण इसाबेलला इंडस्ट्रीत लॉन्च करण्यासाठी प्रयत्न करती आहे. 

वृत्तानुसार, सलमान लवकरच इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करू शकतो. वास्तविक यापूर्वीदेखील तिच्या बॉलिवूड डेब्यूवरून चर्चा रंगली होती. परंतु यावेळेस सलमान तिला लॉन्च करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. सलमान तिला अभिनेता सूरज पंचोली याच्याबरोबर लॉन्च करणार आहे. या दोन्ही कलाकारांना सलमान स्वत: तयार करीत आहे. सल्लू भूषण कुमारला सूरज आणि इसाबेलला लॉन्च करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सूरज एक चित्रपट प्रोड्यूस करीत आहे. सूरज आणि इसाबेलचा हा नवा चित्रपट रेमो डिसूझाचा असिस्टंट स्टॅनली डिकॉस्टर दिग्दर्शित करणार आहे. चित्रपटाची शूटिंग जून २०१८ मध्ये सुरू होणार आहे. परंतु इसाबेलने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसतानाही, आपले नखरे दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्याचे झाले असे की, लॅक्मेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनल्यानंतर इसाबेल पहिल्यांदा एका पत्रकार परिषदेसाठी पोहोचली होती. याठिकाणी तिला तिच्या आजूबाजूला असलेल्या लायटिंगची समस्या जाणवू लागली. तिला कमी प्रकाशात शूट करायचे नव्हते. त्यामुळे मॅडमने लगेचच हुकूम काढला. जोपर्यंत पुरेसे लाइट लावले जात नाही, तोपर्यंत शूट केले जाणार नाही. मग काय लगेचच सगळी यंत्रणा कामाला लागली. परंतु या सर्व खटाटोपात तब्बल एक तास वाया गेला. 

त्याचबरोबर यावेळी तिने तिच्या टीमला अगोदरच स्पष्ट केले होते की, कोणीही तिला बॉलिवूड एंट्रीबद्दल विचारू नये. इसाबेल एवढ्यावरच थांबली नाही तर, चक्क पत्रकार परिषद अर्ध्यात सोडून गेली. दरम्यान, याअगोदर इसाबेलला कॅटरिनासोबत विराट-अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील मीडियासमोर तिचा टॅँट्रम स्पष्टपणे दिसून आला. 
Web Title: Katrina Kaif's sister showed color before entering Bollywood!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.