Katrina Kaif's persistence 'dear' fell! | ​कॅटरिना कैफचा पिच्छा पुरवणे ‘या’ चाहत्याला पडले महाग!

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांच्या अनेक सूरस कथा आपण ऐकल्या असतील. अगदी अलीकडे आलिया भट्ट  तिच्या एका फॅन्सवर भडकली. यामुळे या फॅन्सला चक्क रडू कोसळले. आता कॅटरिना कैफबद्दलही अशीच एक बातमी ऐकायला मिळते आहे. ती आपल्या या चाहत्यावर भडकलीच नाही तर तिने त्याला चक्क धक्के देत हाकलून लावले.
होय, कॅटरिना आपल्या डॉक्टरकडे गेली होती. येथून परतताना एका चाहत्याने कॅटरिनाला एक सेल्फी देण्याची गळ घातली. पण कॅटरिनाने त्याकडे दुर्लक्ष केले अन् आपला रस्ता धरला. पण त्या मजनू चाहत्याने कॅटरिनाचा पिच्छा सोडला नाहीच. तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. कॅटची गाडी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या आत गेली तरीही तो तिथून हटेना. तो तिथेच उभा राहिला आणि कॅटरिनाचे नाव घेऊन सेल्फी देण्याची मागणी करू लागला. केवळ एवढेच नाही तर जोरजोरात कॅटरिनाच्या नावाने ओरडू लागला. मग काय, कॅटरिना तिच्या ड्रायव्हर जवळ काही तरी कुजबुजली. यानंतर कॅटरिनाचा ड्रायव्हर त्या चाहत्याजवळ आला आणि त्याच्या मुस्काटात लगावून दिली. शिवाय त्याला धक्के देत बाहेर हाकलून दिले. 

ALSO READ : कॅटरिना कैफ इन्स्टावर तिच्या एक्स बॉयफ्रेण्डपासून राहणार चार हात लांब!!

निश्चिपणे कॅटरिनाच्या या वागण्याने त्या चाहत्याला प्रचंड धक्का बसला आणि त्याच्या डोळयांतून अश्रू ओघळू लागले. खरे तर कॅटरिना तिच्या चाहत्यांशी बरीच फ्रेंडली राहते. पण कदाचित त्यादिवशी तिचे मूड नसावे. म्हणून तिने त्या चाहत्याकडे दुर्लक्ष केले. आता मॅडमचे मूड नाही म्हटल्याव कोण काय करणार? त्या चाहत्यालाही हे कळायला हवे होते ना?
कॅटरिना सध्या ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात ती सलमानसोबत दिसणार आहे.
Web Title: Katrina Kaif's persistence 'dear' fell!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.