Katrina Kaif's marriage with Salman and Ranbir is not there. | ​सलमान वा रणबीर नाही तर ‘या’ अभिनेत्रीमुळे थांबलेय कॅटरिना कैफचे लग्न!!

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचे ‘दिवाने’ अनेक आहेत. कॅटची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहते आतूर असतात.   कॅटचे चाहते  याशिवायही आणखी एका गोष्टीसाठी उत्सूक आहेत. ती म्हणजे, कॅटचे लग्न. होय, कॅट कधी आणि कुणासोबत लग्न बंधनात अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. तुम्हीही यापैकीचं एक असाल तर, आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास खबर आहे. होय, कॅटला वधूच्या रूपात बघण्यास तुम्ही आतूर आहात. पण आलिया भट्टचे लग्न झाल्याशिवाय हे शक्य नाही. आश्चर्य वाटले ना? आता कॅटच्या लग्नाचा अन् आलियाचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर संबंध आहे. हे आम्ही नाही तर स्वत: कॅटरिनानेच सांगितले आहे.अलीकडे कॅटरिना व आलिया या दोघींनी नेहा धूपियाच्या चॅट शोवर हजेरी लावली. यावेळी कॅटरिनाला लग्नाबद्दल विचारले गेले. तू कधी लग्न करणार? असा थेट प्रश्न नेहाने कॅटला केला. यावर कॅटचे उत्तर ऐकून सगळे अवाक् झालेत.  आधी आलियाचे लग्न होऊ द्या. तिच्या लग्नानंतरच मी लग्न करणार, असे कॅट म्हणाली. तिच्या या उत्तरावर आलियाही खळखळून हसायला लागली. साहजिकच आपणही कॅटचे हे उत्तर हसण्यावारीच न्यायला हवे. कारण तिच्या या उत्तरावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे इतक्यात तरी कॅटचे लग्नाचे काहीही प्लॅनिंग नाहीये. असे नसते तर तिने सगळे काही आलियावर ढकलून अशी वेळ मारून नेली नसती. आलिया व कॅटरिना दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींच्या मैत्रीच्या बातम्या सर्रास मीडियात येत असतात. 

ALSO READ : ​कॅटरिना कैफचा आहे ‘या’ चित्रपटांवर डोळा!

कॅटबद्दल बोलायचे तर कॅटचे नाव सलमान खान व रणबीर कपूरसोबत जोडले गेले आहे. आधी कॅट सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर ती रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. या दोघांसोबतचे कॅटचे नाते लग्नापर्यंत पोहोचेल, असे लोकांना वाटले होते. पण असे काहीच घडले नाही. आता कॅट कुणाशी लग्नगाठ बांधते, ते बघूच.
Web Title: Katrina Kaif's marriage with Salman and Ranbir is not there.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.