‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:12 AM2019-03-26T11:12:49+5:302019-03-26T11:16:03+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे. 

katrina kaif to star opposite salman khan in the third part of the ek tha tiger franchise | ‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान व कॅटच्या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मैने प्यार क्यूं किया, युवराज, पार्टनर, बॉडीगार्ड अशा अनेक चित्रपटातील या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे. 
तुम्ही जाणताच की, १०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या जोडीच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटानेबॉक्स ऑफिसवर धूम केली होती. यानंतर २०१७ मध्ये प्रदर्शित या चित्रपटाचा सीक्वल ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड ध्वस्त केले होते. आता ‘एक था टायगर’ या सीरिजचा तिसरा सिनेमा येतोय आणि या सीक्वलमध्ये पुन्हा एकदा सलमान व कॅटची जोडी दिसणार आहे. सलमानने स्वत: सौदी फिल्म फेस्टिवलमध्ये याचा खुलासा केला.

तूर्तास या जोडीचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या २४ एप्रिलला याचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय आणि ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चाहते ‘भारत’कडे डोळे लावून बसले आहेत.  ‘एक था टायगर’च्या तिस-या पार्टचीही चाहत्यांना तितकीच प्रतीक्षा असणार आहे.


सलमान व कॅटच्या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मैने प्यार क्यूं किया, युवराज, पार्टनर, बॉडीगार्ड अशा अनेक चित्रपटातील या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सलमान  व कॅट एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक कॅट रणबीर कपूरवर भाळली आणि तिने सलमानसोबत ब्रेकअप केले. पुढे रणबीर व कॅट यांचेही ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर कॅटरिना पुन्हा एकदा सलमानच्या कंपूत परतली आहे. केवळ इतकेच नाही गेल्या काही दिवसांत दोघांची मैत्रीही चांगलीच बहरली आहे.

Web Title: katrina kaif to star opposite salman khan in the third part of the ek tha tiger franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.