Katrina Kaif shares photo with Aamir Khan! People have fun !! | ​ आमिर खान सोबतचा ‘हा’ फोटो शेअर करून फसली कॅटरिना कैफ ! लोकांनी घेतली मजा!!

कॅटरिना कैफ सध्या जाम आनंदात आहे आणि  का नसणार? तिच्या  अलीकडे आलेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने इतकी कमाई जी केलीयं. सध्या कॅटरिनाच्या झोळीत एकापेक्षा एक चांगले चित्रपट आहेत. होय, लवकरच कॅटरिना  शाहरूख खानसोबत ‘झिरो’मध्ये दिसणार आहे. यानंतर आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही कॅटकडे आहे. सध्या याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये कॅट बिझी आहे. अलीकडे कॅटरिनाने ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या सेटवरचा एक फोटो शेअर केला. या फोटोत कॅटरिना आमिर खान आणि चित्रपटाची दुसरी हिरोईन फातिमा सना शेखसोबत दिसते आहे. ‘ठग्स, माझे प्रिय आमिर खान आणि फातिमा सना शेख,’ असे  कॅप्शन कॅटने या फोटोला दिले आहे. फोटोत आमिर खान ‘ठग्स’ लूकमध्ये दिसतो आहे तर फातिमा व सना आपल्या साध्याभोळ्या अंदाजात आहेत.
कॅटरिनाने हा फोटो शेअर केला आणि अगदी काही सेकंदात लोकांनी यावर कमेंट्स करणे सुरू केले. पण या कमेंट्समध्ये या फोटोची तारीफ कमी अन् आमिरची खिल्ली अधिक उडवली गेली होती.
फोटो पाहून काहींनी कॅट व फातिमा या दोघींची प्रशंसा केली. पण आमिरची मात्र अनेकांनी मजा घेतली. त्याच्या उंचीवरून लोकांनी त्याला ट्रोल केले. ‘फोटो तर चांगला आहे. पण आमिर भाई तू कॅटरिनापेक्षा उंच कसा झालास?’ असे अनेक खोचक प्रश्न लोकांनी विचारले.

 

आमिरने अद्याप या टीकेला उत्तर दिलेले नाही. पण आमिर अशा प्रकारे ट्रोल झालेला पाहून कॅटरिना मात्र चांगलीचे हिरमुसली असणार, हे नक्की. कुठून दुर्बुद्धी सुचली अन् हा फोटो शेअर केला, असे तिला झाले असावे...होय ना?
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत आहेत. यात आमिर, कॅटरिना, फातिमा यांच्याशिवाय अमिताभ बच्चन हेही मुख्य भूमिकेत आहेत.
Web Title: Katrina Kaif shares photo with Aamir Khan! People have fun !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.