रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:55 AM2019-01-18T10:55:46+5:302019-01-18T10:59:22+5:30

रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत.  ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत.

​Katrina Kaif not a part of Akshay Kumar's 'Sooryavanshi'? heres what director rohit shetty said | रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!!

रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यंतरी अक्षयने या चित्रपटासाठी अभिनेत्री पूजा हेगडेचे नाव सुचवल्याची बातमी होती.

रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत.  ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. रोहितचा हा चित्रपट खास असणार आहे, कारण रोहित शेट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम करणार आहे. ‘सूर्यवंशी’त अक्षय कुमार एका एटीएस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.

होय, ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार, अशी खबर होती. पण ताज्या बातमीनुसार, कॅटरिनाने हा चित्रपट धुडकावून लावला आहे. याचे कारण म्हणजे, चित्रपटात हिरोईनला काहीही वाव नव्हता आणि निव्वळ शो पीस म्हणून वावरण्यात कॅटला म्हणे रस नव्हता. पण आता रोहितनेचं याबाबत नवा खुलासा केला आहे. होय, ‘सूर्यवंशी’मध्ये कॅटरिना असणार आणि तिने हा चित्रपट नाकारला या दोन्ही निव्वळ अफवा असल्याचे रोहितने म्हटले आहे. म्हणजे, या चित्रपटात कॅटरिना नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या चित्रपटात कुठल्या अभिनेत्रीची वर्णी लागते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

मध्यंतरी अक्षयने या चित्रपटासाठी अभिनेत्री पूजा हेगडेचे नाव सुचवल्याची बातमी होती. ‘सूर्यवंशी’मध्ये फिमेल लीडचा रोल केवळ १५ ते २० मिनिटांचा आहे. म्हणजे, हिरोईनसाठी करण्यासारखे काहीही नाही. पण तरिही यात पूजा असावी, अशी अक्षयची इच्छा आहे. आता रोहित अक्षयच्या या इच्छेला मान देतो की आणखी काही वेगळा निर्णय घेतो, ते पाहूच.
 रोहितच्या या आगामी चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत.  

Web Title: ​Katrina Kaif not a part of Akshay Kumar's 'Sooryavanshi'? heres what director rohit shetty said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.