Katrina Kaif on marriage & children | कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय
कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय

ठळक मुद्दे लग्न करायचे असे काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात नक्कीच होते. पण काही कारणांनी त्यावेळी ते शक्य होऊ शकले नाही.तुमच्या आयुष्यात ज्या प्रमाणे गोष्टी लिहून ठेवल्या असतात, त्याच प्रकारे त्या घडतात असे मला वाटते. त्यामुळे त्या गोष्टींविषयी आता मी विचार करणे बंद केले आहे.आता मी सगळ्या गोष्टी देवावर सोडल्या आहेत. योग्य वेळी ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल याची मला खात्री आहे.

कॅटरिना कैफ लवकरच प्रेक्षकांना झिरो या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा यांच्यासोबत तिची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. कॅटरिना सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्याविषयी देखील खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. 

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री गेल्या वर्षभरात लग्नबंधनात अडकल्या आहेत. आता त्यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये कोणती अभिनेत्री लग्न करेतय याची उत्सुकता लोकांना लागली आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिनाला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तिने म्हटले आहे की, लग्न करायचे असे काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात नक्कीच होते. पण काही कारणांनी त्यावेळी ते शक्य होऊ शकले नाही. तुमच्या आयुष्यात ज्या प्रमाणे गोष्टी लिहून ठेवल्या असतात, त्याच प्रकारे त्या घडतात असे मला वाटते. त्यामुळे त्या गोष्टींविषयी आता मी विचार करणे बंद केले आहे. माझ्या आयुष्यात काही गोष्टी माझ्या मर्जीप्रमाणे झाल्या नाहीत. त्याचा त्रास देखील मला खूप सहन करावा लागला. पण आता मी सगळ्या गोष्टी देवावर सोडल्या आहेत. योग्य वेळी ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल याची मला खात्री आहे. विमानतळावर शोकेसमध्ये ठेवलेले पुस्तक  उचलण्यासाठी मी वाकेन आणि त्याचवेळी कोणी तरी येऊन मला मदत करेन, आमची नजरानजर होईल आणि तो माझ्या आयुष्यात येईल... असे कधीतरी माझ्या आयुष्यात घडेल याची मला खात्री आहे.

कॅटरिना कैफ अाणि सलमान खान यांच्या प्रेमकथेची चर्चा मैंने प्यार क्यो किया या चित्रपटाच्या वेळी झाली होती. पण काहीच वर्षांत त्यांचे ब्रेकअप झाले आणि कॅटरिना आणि रणबीर कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. ते लग्न करणार अशा चर्चा सुरू असतानाच पाच वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचे ठरवले. 


Web Title: Katrina Kaif on marriage & children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.