Katrina Kaif has lost Jackie Shroff; Bungalow had to be mortgaged! | कॅटरिना कैफच्या नादात जॅकी श्रॉफ झाले बरबाद; बंगला ठेवावा लागला गहाण !

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पहिलाच ‘हीरो’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने जॅकीदा रातोरात सुपरस्टार बनले. इंडस्ट्रीतील मोठमोठे सुपरस्टार त्यांची डेट घेण्यासाठी चकरा मारत असत. मात्र म्हणतात ‘वेळ प्रत्येक दिवशी सारखी नसते’ अगदी असेच काहीशे जॅकीदाच्या बाबतीतही घडले. कारण जॅकीदाच्या करिअरमध्ये एक काळ असाही आला जेव्हा त्यांच्याकडे एकही चित्रपट नव्हता. शिवाय त्यांना कास्ट करण्यात कोणालाही रस नव्हता. अशात जॅकी श्रॉफने स्वत:च एक चित्रपट प्रोड्यूस करण्याचा विचार केला. हा चित्रपट दुसरा-तिसरा कुठलाही नसून, कॅटरिना कैफ हिचा डेब्यू ‘बूम’ हा चित्रपट होता. 

या चित्रपटाच्या माध्यमातून ते कॅटरिना कैफला लॉन्च करणार होते. जॅकीला असे वाटत होते की, एवढ्या सुंदर अभिनेत्रीला लॉन्च केल्यास तरुण पिढी तिला बघण्यासाठी नक्कीच सिनेमागृहात पोहोचेल. मात्र जॅकीदाचा हा डाव नेमका फसला. कारण चित्रपटाला पहिलाच धक्का सेन्सॉर बोर्डाने दिला. सेन्सॉर या चित्रपटाला बी ग्रेड चित्रपटांच्या कॅटेगिरीमध्ये टाकले. कारण चित्रपटात खूपच इंटीमेट सीन्सचा भडीमार करण्यात आला होता. चित्रपटात कॅटरिनाने गुलशन ग्रोवरसोबत खूपच बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले होते. त्यामुळेच सेन्सॉरने चित्रपटाला बी ग्रेड दर्जा दिला. त्यामुळे जॅकीदाने केलेल्या सर्व मेहनतीवर एकप्र्रकारे पाणी फिरले. पुढे दुसरा धक्का तेव्हा बसला जेव्हा हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लीक झाला. त्यामुळे जॅकीदाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही पाण्यात वाहून गेल्या. त्यावेळी जॅकीदाने इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्रांकडे मदतीसाठी हात पसरले. परंतु कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले नाही. 

अखेर जॅकीदाने त्यांचा बंगला गहाण ठेवला. त्यांच्या या चित्रपटाला डिस्ट्रिब्यूटर्सही खरेदी करण्यास तयार नव्हते. शिवाय या चित्रपटानंतर जॅकी आणि कॅटरिना या दोघांच्या नात्यात दरारही निर्माण झाली. अशाप्रकारे कॅटरिनाचे करिअर घडविण्याच्या नादात स्वत: जॅकी श्रॉफ बरबाद झाले. 
Web Title: Katrina Kaif has lost Jackie Shroff; Bungalow had to be mortgaged!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.