VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 10:50 AM2019-07-03T10:50:56+5:302019-07-03T10:51:39+5:30

कतरीना कैफ एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही दुमत नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण हे चाहते कधीकधी वैताग आणतात. अलीकडे दिल्ली विमानतळावर कतरीनासोबत असेच काही झाले.

katrina kaif handling crazy fans trying to take selife when actress comes out of airport | VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या कॅट ‘सूर्ववंशी’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

कतरीना कैफ एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही दुमत नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण हे चाहते कधीकधी वैताग आणतात. अलीकडे दिल्ली विमानतळावर कतरीनासोबत असेच काही झाले. नुकतीच कॅट दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाली. कॅट दिसताच चाहत्यांनी तिला घेतले. खरे तर कॅटसोबत तिचे बॉडीगार्ड्स होते. पण चाहत्यांनी अचानक कॅटला घेराव घातला आणि सेल्फी घ्यायला सुरुवात केली. सेल्फीसाठी चाहते असे काही तुटून पडले की, कॅटच्या बॉडीगार्ड्सचेही ते ऐकेनासे झालेत. इतके कमी की काय म्हणून, सेल्फी घेताना धक्काबुक्की करायला लागले. सुरुवातीला गार्ड्सनी या चाहत्यांना आवरण्याचे प्रयत्न केलेत. पण चाहत्यांची धक्काबुक्की वाढत गेली. अखेर स्थिती बिघडण्यापूर्वीच कतरीनानेच मोर्चा सांभाळला.

तिने गार्ड्सला बाजुला व्हायला सांगितले आणि एकाठिकाणी थांबली. दूर राहून सेल्फी घ्या, असे तिने चाहत्यांना बजावले. तिने केवळ स्थितीच सांभाळली नाही तर चाहत्यांची सेल्फीची इच्छा पूर्ण करत, मग शांतपणे पुढे गेली. अशास्थितीत अनेक स्टार्स स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसतात आणि भडकतात. पण कतरीनाने शांतपणे क्रेजी चाहत्यांना सांभाळले. यासाठी तिचे कौतुक तर व्हायलाच हवे.

सध्या तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ‘आपल्या आवडत्या स्टारला पाहिल्यावर उत्साहित होणे स्वाभाविक आहे. मात्र सेल्फीसाठी अशाप्रकारे धक्काबुक्की करणे चुकीचेआहे. पण कतरीनाने योग्य प्रकारे सर्वांना हॅन्डल केले,’ असे एका युजरने लिहिले आहे. ‘ती पण माणूस आहे. तिची स्वत:ची प्रायव्हसी आहे आणि त्याचा सन्मान व्हायला हवा’, असे काहींनी म्हटले आहे.

सध्या कॅट ‘सूर्ववंशी’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टी दिग्दर्शित करत असून यात मोहरा सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. नुकतेच या गाण्याचेशूट पूर्ण झाले. 

Web Title: katrina kaif handling crazy fans trying to take selife when actress comes out of airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.