Katrina Kaif had taken her away abroad to try Ranbir Kapoor's smoking habit | रणबीर कपूरची स्मोकिंगची सवय सोडवण्यासाठी कॅटरिना कैफ त्याला परदेशात ही घेऊन गेली होती

गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर माहिर खानसोबतच्या फोटोंमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोंमध्ये शाहरुख खानच्या रईस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू  करणारी अभिनेत्री माहिरा खानसोबत स्मोकिंग करताना दिसला होता. रणबीर आणि माहिराच्या या फोटोंची चांगलीच चर्चा झाली होती. न्यूयॉर्कच्या एका हॉटेलबाहेर दोघे स्मोकिंग करताना दिसले होते. असे पहिल्यांदाच झाले नाही कि रणबीर कपूर स्मोकिंग करताना दिसला. कॅटरिना कैफसोबत सुद्धा रणबीर स्मोकिंग करताना दिसला होता. 
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हा किस्सा त्यावेळीचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूर कॅटरिना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये असताना खूप स्मोकिंग करायचा. ज्यामुळे कॅटरिना कैफ नाराज होती. रणबीरचे ही सवय कॅटरिनाला सोडवायची होती. यासाठी कॅटरिनाने अनेक युक्त्या वापरल्या होत्या. 
एक न्यूज वेबसाईटच्यानुसार त्यावेळी रणबीरची स्मोकिंगची सवय सोडवण्यासाठी कॅटरिना त्याला ऑस्ट्रियाला घेऊन गेली होती. होय, तुम्ही बरोबर वाचलात कॅटरिनाच होती जी रणबीरला स्मोकिंगची सवय सोडवण्यासाठी ऑस्ट्रियामधल्या एका हेल्थ केअरमध्ये घेऊन गेली होती. मात्र त्याचा फारसा फरक रणबीरवर पडला नव्हता.  त्याने तीन आठवडे सिगरेटला हात लावला नव्हता. यानंतर ही स्मोकिंगची सवय सोडवण्यासाठी रणबीरने अनेक प्रयत्न केले मात्र यावेळी ना त्याच्यासोबत कॅटरिना कैफ होती ना दीपिका पादुकोण.

ALSO READ :  तर रणबीर कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती कॅटरिना कैफ.. अनेक चित्रपटांना लांबूनच केले होते बाय-बाय
    
रणबीर लवकरच आयान मुखर्जीच्या ब्रह्मस्त्र चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतो आहे तर यात रणबीरच्या अपोझिट आलिया भट्ट झळकणार आहे. अमिताभ बच्चनदेखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे करण जोहरने नुकतेच जाहीर केले होते. याचित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.  २०१९ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  तर संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार आहे. 
Web Title: Katrina Kaif had taken her away abroad to try Ranbir Kapoor's smoking habit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.