katrina kaif fans misbehave with her, insist for selfie in canada | कॅटरिना कैफसोबत चाहत्यांचे गैरवर्तन! व्हिडिओ झाला व्हायरल!!
कॅटरिना कैफसोबत चाहत्यांचे गैरवर्तन! व्हिडिओ झाला व्हायरल!!

कॅटरिना कैफ सध्या सलमान खानसोबत ‘दबंग टूर’वर विविध देशांचा दौरा करतेय. यादरम्यान ‘दबंग टूर’ची संपूर्ण टीमचा मुक्काम कॅनडात पडला आणि याच कॅनडात काही चाहत्यांनी कॅटरिनासोबत गैरवर्तन केले. होय,  कॅनडाच्या वँकूव्हर शहरात काही चाहते कॅटरिनासोबत हुल्लडबाजी करताना दिसले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.

 कॅटरिना शो संपवून परतत असताना ही घटना घडली. कॅट आपल्या कारकडे जात असताना काही चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करू लागले. पण कॅटरिनाने नकार दिला आणि ती आपल्या कारकडे घाईघाईत चालू लागली. (मी तुमच्यासोबत फोटो काढू इच्छित नाही, असे कॅटरिना व्हिडिओत म्हणताना दिसतेय. ) पण तिचे हे वागणे काही चाहत्यांना खटकले. ते चांगलेच नाराज झालेत. इतके की, कॅट पाहून जोरजोरात तिची नक्कल करू लागलेत. चाहते खिल्ली उडवत आहे, म्हटल्यावर साहजिकचं कॅटरिनाही संतापली. तिने त्यांना रोखण्याचे प्रयत्न केलेत. तिचा आवाजही चढला. पण याचवेळी आणखी काही चाहते तिथे आलेत आणि त्यांनी कॅटरिना अक्षरश: घेरले व तिच्यासोबत सेल्फी काढू लागलेत. हा प्रकार इथेच थांबला नाही तर त्या गर्दीतही काहीजण कॅटरिनाबद्दल आक्षेपार्ह बोलताना दिसले. आम्ही सलमानसाठी येथे आलो आहोत, कॅटरिनासाठी नाही, असे ते म्हणाले.
हा प्रकार घडला तेव्हा एक सुरक्षारक्षक तिच्यासोबत होता. पण चाहत्यांना हुसकावून लावण्याऐवजी त्याने कॅटची सुरक्षा महत्त्वाची मानली. कॅटरिनानेही संयमाने ही स्थिती हाताळली.


Web Title: katrina kaif fans misbehave with her, insist for selfie in canada
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.