कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 01:22 PM2019-04-24T13:22:14+5:302019-04-24T13:22:39+5:30

लवकरच कतरीना सलमानसोबत ‘भारत’मध्ये दिसणार आहे. यापाठोपाठ अक्षय कुमारसोबतचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही तिने साईन केला आहे. आता आणखी एका दमदार चित्रपटात कतरीनाची वर्णी लागल्याची शक्यता आहे.

Katrina Kaif to essay the role of athlete PT Usha in her biopic? | कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा?

कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा?

googlenewsNext
ठळक मुद्देपी.टी. उषावर चित्रपट येणार, अशी चर्चा २०१७ पासून सुरु आहे. आधी या चित्रपटासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते.

काही वर्षांपूर्वी कतरीना कैफचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट फ्लॉप झालेत. आता कॅटचे फिल्मी करिअर संपुष्टात आले, असे वाटत असतानाच ‘चतूर’ कतरीनाने पुन्हा एकदा सलमान खानला जवळ केले आणि ‘टायगर जिंदा है’द्वारे दमदार वापसी केली. यानंतर कॅटने जणू मागे वळून पाहिलेच नाही. आता तर कॅटकडे चित्रपटाच्या रांगा लागल्या आहेत. लवकरच कतरीना सलमानसोबत ‘भारत’मध्ये दिसणार आहे. यापाठोपाठ अक्षय कुमारसोबतचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही तिने साईन केला आहे. आता आणखी एका दमदार चित्रपटात कतरीनाची वर्णी लागल्याची शक्यता आहे. होय, मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन अवार्ड विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा हिचे बायोपिक आॅफर झाले आहे.

पी.टी. उषावर चित्रपट येणार, अशी चर्चा २०१७ पासून सुरु आहे. आधी या चित्रपटासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते. पण काही कारणास्तव पी.टी. उषावरचा हा चित्रपट रखडला. पण आता सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.

दिग्दर्शक रेवती एस वर्मा यांनी पुन्हा एकदा या बायोपिकसाठी कंबर कसली आहे. रेवती यांनी या बायोपिकसाठी कतरीनाच्या नावाला पसंती दिली आहे. रेवतीने कॅटसोबत अनेकदा चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीही रेवतीने कॅटची भेट घेत कथेवर चर्चा केली. अद्याप कॅटने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. पण तिने हा चित्रपट स्वीकारलाच तर हे तिचे पहिले बायोपिक असेल. साहजिकच कॅटला यासाठी खूप घाम गाळावा लागेल. शिवाय उषाकडून अ‍ॅथलेटिक्सचे धडेही घ्यावे लागतील.
पी.टी. उषाचे हे बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.

Web Title: Katrina Kaif to essay the role of athlete PT Usha in her biopic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.