Katrina Bareer worried about Alia! Feel the 'one thing' !! | आलियाच्या चिंतेने कॅटरिना बेजार! वाटतेय ‘या’ एका गोष्टीची भीती!!
आलियाच्या चिंतेने कॅटरिना बेजार! वाटतेय ‘या’ एका गोष्टीची भीती!!
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमाच्या चर्चा चौफेर आहेत. आता तर ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ स्टाईलमध्ये आलिया व रणबीर एकमेकांसोबत फिरताहेत. कालचं रात्री रणबीर आलियाला सोबत घेऊन संजय दत्तच्या घरी त्याला भेटायला पोहोचला. यानंतर रात्री उशीरा त्याने आलियाची वडिलांसोबतही भेट घालून दिल्याचे कळते. त्यापूर्वी आलिया रणबीरची आई व बहिणीसोबत डिनर एन्जॉय करतानाही दिसली. आलिया व रणबीरचे चाहते या ‘क्यूट’ कपलच्या तितक्याच ‘क्यूट’ बातम्या ऐकून आनंदित आहेत. पण एक व्यक्ति मात्र या बातम्या ऐकून कमालीची अस्वस्थ आहे. ही व्यक्ति म्हणजे, रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ.
होय, आलिया व रणबीरच्या नव्याने फुलत असलेल्या नात्यामुळे कॅटरिना आतून अस्वस्थ आहे. खरे तर तर अस्वस्थ असण्यापेक्षाही तिला आलियाची काळजी वाटू लागली आहे. होय, आपल्यासारखाचं हा आलियालाही फसवणार नाही ना, अशी भीती तिला वाटतेय.ALSO READ :SEE PICS : रणबीर कपूर-आलिया भट्ट पुन्हा दिसले सोबत, संजय दत्तच्या घरी पोहोचले एकत्र!!

डेक्कन क्रोनिकलने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. एकेकाळी रणबीर व कॅटरिनाचे प्रेम असेच बहरात होते. कॅटरिनासाठी रणबीरने त्याचे घरही सोडले होते. पण अचानक काहीतरी बिनसले आणि रणबीर व कॅटचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपमधून सावरायला कॅटला बरेच प्रयत्न करावे लागले. कारण कॅट रणबीरमध्ये मनापासून गुंतली होती. रणबीर तुलनेने या  धक्क्यातून बराच लवकर  सावरला. केवळ सावरलाचं नाही तर कॅटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे नाव लगेच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि त्यानंतर आलियासोबत जोडले गेले. माहिरासोबत रणबीरचे काय होते, माहित नाही. पण आलियाबद्दल रणबीर गंभीर वाटतो आहे. पण कॅटला कदाचित रणबीरवर फारसा विश्वास राहिला नसावा. आलिया कॅटची चांगली मैत्रिण आहे. आपल्याप्रमाणेच कॅटने आलियालाही फसवले तर अशी चिंता त्यामुळे तिला वाटू लागली आहे.
Web Title: Katrina Bareer worried about Alia! Feel the 'one thing' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.