साराच्या घरी काय करत होता कार्तिक आर्यन?, लपण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्यांनी टिपलंच..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 12:40 PM2019-05-02T12:40:39+5:302019-05-02T12:45:35+5:30

'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय.

Kartik Aryan Spoted at Sara ali khan’s Residence | साराच्या घरी काय करत होता कार्तिक आर्यन?, लपण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्यांनी टिपलंच..

साराच्या घरी काय करत होता कार्तिक आर्यन?, लपण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्यांनी टिपलंच..

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बी - टाऊनमध्ये बॉलीवुडचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि छोटे नबाव सैफ अली खानची लेक अभिनेत्री सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. त्यातच नुकतंच अभिनेता कार्तिक आर्यन हा अभिनेत्री सारा अली खानच्या घरातून बाहेर पडत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. 

यावेळी कार्तिकने माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून लपण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्तिकने काळ्या रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला असल्याचे पाहायला मिळालं. कार्तिकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कॉफी विद करण या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. 

 


शिवाय लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायलाही तो विसरत नाही. सध्या सारा आणि कार्तिक हे दोघं इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहेत. या शुटिंगचं दिल्लीतील शेड्युल पूर्ण झालंय. या चित्रपटात कार्तिक सारासह रोमान्स करताना पाहायला मिळेल. या दोघांचे काही व्हिडिओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. 

 

सारा आणि कार्तिक सध्या ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही व्हिडीओद्वारे पाहायला मिळते.काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या सेटवरचा सारा व कार्तिकचा एक व्हिडीओ समोर आला होता काही तासांत तो  तुफान व्हायरल झाला होता.

Web Title: Kartik Aryan Spoted at Sara ali khan’s Residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.