कार्तिक आर्यन म्हणतो, करण जोहरने सिनेमातून काढले नाही मीच सिनेमा सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:02 AM2018-12-12T11:02:00+5:302018-12-12T11:12:42+5:30

कार्तिक आर्यन हे नाव सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमानंतर घराघरात पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खानमुळे कार्तिक चर्चेत आला होता.

Kartik Aryan says, Karan Johar did not remove from the movie, I left the movie | कार्तिक आर्यन म्हणतो, करण जोहरने सिनेमातून काढले नाही मीच सिनेमा सोडला

कार्तिक आर्यन म्हणतो, करण जोहरने सिनेमातून काढले नाही मीच सिनेमा सोडला

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहरच्या सिनेमातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहेकरिनाने कार्तिकसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय

कार्तिक आर्यन हे नाव सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमानंतर घराघरात पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खानमुळे कार्तिक चर्चेत आला होता. सारानेकार्तिक आर्यनला डेट करायचे आहे असे म्हटले होते कारण तिला कार्तिक खूप क्युट वाटतो. कार्तिकच्या प्रोफेशन लाईफबाबत बोलायचे झाले तर तो लवकरच लुका-छिपीमध्ये दिसणार आहे. यासगळ्यात एक वेगळीच चर्चा कानावर येते आहे ती म्हणजे करण जोहरच्या सिनेमातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार कार्तिकला करणच्या सिनेमासाठी अप्रोच करण्यात आले. मात्र कार्तिकच्या टीमने उतावळेपणा करत  सिनेमाच्या अधिकृत घोषणा होण्याआधीच माहिती बाहेर पसरवली. त्यामुळे कार्तिकवर नाराज झालेल्या करणने त्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. तसेच या सिनेमात कार्तिक सोबत करीना कपूर काम करणार होती मात्र करिनाने कार्तिकसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय. यासंदर्भात कार्तिकला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ''मी त्या भूमिकेशी कनेक्ट होऊ शकलो नाही. त्यामुळे मीच सिनेमा सोडून दिला.''   

दिनेश विजान यांच्या सिनेमात  कार्तिक आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. कार्तिक यात एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. यासिनेमात दोघांना प्रादेशिक भाषा बोलायची आहे यासाठी दोघे खूप मेहनत घेतायेत.  १ मार्च २०१९ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Kartik Aryan says, Karan Johar did not remove from the movie, I left the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.