Video : इम्तियाज अलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला कार्तिक आर्यन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:20 PM2019-07-02T14:20:01+5:302019-07-02T14:20:52+5:30

होय, कार्तिकचा एक इमोनशल व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

kartik aryan gets teary on the last day of love aaj kal 2 set | Video : इम्तियाज अलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला कार्तिक आर्यन!!

Video : इम्तियाज अलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला कार्तिक आर्यन!!

googlenewsNext
ठळक मुद्देसोनू के टीटू की स्वीटी आणि पाठोपाठ  लुका छुपी  या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिककडे सध्या निर्मात्यांची  रांग लागली आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या ‘लव आज कल 2’ या आगामी चित्रपटाचे 66 दिवसांचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले.  शूटींग संपल्यानंतरची रॅपअप पार्टीही रंगली. पण या पार्टीत कार्तिक व आर्यन दोघेही उदास दिसले. कार्तिक तर इतका भावूक झाला की, ढसाढसा रडू लागला.
होय, ‘लव आज कल 2’च्या सेटवरचा कार्तिकचा एक इमोनशल व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. चित्रपटाचा शेवटचा सीन संपल्यासंपल्या कार्तिक इतका भावूक झाला की, दिग्दर्शक इम्तियाल अलीच्या गळ्यात पडून रडू लागला.


कार्तिकने सारासोबतचा एक फोटो शेअर करत एक भावूक पोस्टही लिहिली. ‘ हा चित्रपट, त्याचे शूटींग संपूच नये, असे वाटले. या संपूर्ण प्रवासात प्रिन्सेस सारा अली खानइतकी दुसरी चांगली सोबत असूच शकत नाही. मला तुझ्यासोबत यापुढेही काम करायला आवडेल,’ असे त्याने लिहिले.


साराही कार्तिकच्या आठवणीने व्याकूळ झाली.‘माझी सतत काळजी घेण्यासाठी तुझे आभार. तुझ्यासोबत घेतलेली कॉफी, तुझ्यासोबत प्यालेला चहा...मला पुन्हा हे करायला आवडेल. मी तुला किती मिस करेल, याचा तुला अंदाजही नाही...,’ असे साराने लिहिले.   


सोनू के टीटू की स्वीटी आणि पाठोपाठ  लुका छुपी  या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिककडे सध्या निर्मात्यांची  रांग लागली आहे. मेनस्ट्रीम चित्रपटांमागे न धावता कार्तिकने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनाम, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी असे वेगवेगळ्या धाटणीचे हिट चित्रपट दिलेत आणि  निर्मात्यांचे  लक्ष वेधून घेतले 

Web Title: kartik aryan gets teary on the last day of love aaj kal 2 set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.