कार्तिक आर्यनच्या बाईकवर सारा अली खान! पाहा, व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:56 AM2019-03-18T10:56:26+5:302019-03-18T10:56:58+5:30

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास ही जोडी इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही जोरात आहे.

Kartik Aaryan takes Sara Ali Khan on a bike ride – watch video | कार्तिक आर्यनच्या बाईकवर सारा अली खान! पाहा, व्हिडीओ!

कार्तिक आर्यनच्या बाईकवर सारा अली खान! पाहा, व्हिडीओ!

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास ही जोडी इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही जोरात आहे. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचा सारा व कार्तिकचा एक व्हिडीओ समोर आला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला. या व्हिडीओत दोघेही बाईक राईडचा आनंद घेत आहेत. कार्तिक बाईक चालवतोय आणि सारा त्याच्या मागच्या सीटवर बसलेली दिसतेय.

पण हे काय? या व्हिडीओवरून साराला ट्रोलही केले जातेय. साराने बाईकवर हेल्मेट घातलेले नाही आणि याचवरून ती ट्रोल होतेय. अनेक चाहत्यांनी तिला हेल्मेट न घालता बाईक राईड न करण्याचा सल्ला दिला आहे. आता चाहत्यांचा हा सल्ला सारा किती मनावर घेते ते बघू. शिवाय ‘सार्तिक’ची धम्माल मस्ती आणखी किती रंगते तेही बघूच.

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून सारा अन कार्तिक कायम चर्चेत आहेत.  चाहत्यांनी तर सारा आणि कार्तिकच्या जोडीचे ‘सार्तिक’ असे नामकरणही करून टाकले आहे.  सारा व कार्तिकचा हा चित्रपट ‘लव आज कल’चा सीक्वल असल्याचे म्हटले जातेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. २००९ मध्ये आलेला सैफ अली खान व दीपिका पादुकोणचा ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता.  सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा  यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.  

Web Title: Kartik Aaryan takes Sara Ali Khan on a bike ride – watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.