स्वगृहीच्या स्वागताने भारावला कार्तिक आर्यन! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 07:45 PM2018-08-02T19:45:17+5:302018-08-02T19:46:28+5:30

काल- ग्वाल्हेर या आपल्या मूळ गावी पोहोचल्यावर कार्तिकला स्वत:ही याची अनुभूती आली. लोकांनी त्याचे इतके जल्लोषात स्वागत केले की, कार्तिकसाठीही हा सुखद धक्का होता.

Kartik Aaryan overwhelmed with the warm welcome from his hometown Gwalior | स्वगृहीच्या स्वागताने भारावला कार्तिक आर्यन! पाहा, फोटो!!

स्वगृहीच्या स्वागताने भारावला कार्तिक आर्यन! पाहा, फोटो!!

अभिनेता कार्तिक आर्यन आता चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाआधी कार्तिक बॉलिवूडमध्ये होता. पण इंडस्ट्रीनेचं काय तर प्रेक्षकांनीही त्याची फार दखल घेतली नव्हती. मात्र ‘सोनू के टीटू की स्वीटी’ रिलीज झाला आणि कार्तिक जणू एका रात्रीत स्टार झाला. कार्तिकच्या या चित्रपटाने अनपेक्षित यश मिळवले. या चित्रपटानंतर कार्तिककडे चित्रपटांची रांग लागली. प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. काल- ग्वाल्हेर या आपल्या मूळ गावी पोहोचल्यावर कार्तिकला स्वत:ही याची अनुभूती आली. लोकांनी त्याचे इतके जल्लोषात स्वागत केले की, कार्तिकसाठीही हा सुखद धक्का होता.


लवकरच कार्तिक ‘लुका छिपी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट शूटींग शेड्यूल ग्वाल्हेर येथे होते. स्वगृही शूटींग असल्याने कार्तिक कमालीचा उत्सूक होता. पण ग्वाल्हेरचे लोक आपल्यापेक्षाही अधिक उत्सूक आहे, हे त्याला तिथे गेल्यावर कळले. काल कार्तिक ग्वाल्हेरला पोहोचला आणि स्वगृही झालेल्या स्वागताने तो भारावून गेला. ग्वाल्हेरच्या प्रत्येक रस्यावर केवळ आणि केवळ कार्तिकचे पोस्टर्स होते.

 हे पोस्टर्स पाहून कार्तिक चांगलाच सुखावला. युकेपीच्या मेन गेटपर्यंत पोहोचत नाही तोच कार्तिला आणखी एक सुखद धक्का बसला. शेकडो चाहते हातात फुलांचे हार आणि केक घेऊन त्याच्या स्वागतासाठी उभे होते. कार्तिक जवळ येताच, चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

 कार्तिकनेही अतिशय विनम्रपणे या स्वागताचा स्वीकार केला. अंधविद्यालयाचे काही विद्यार्थीही खास त्याच्या स्वागतासाठी आलेले होते. त्यांनी कार्तिकच्या हिट गाण्यांवर नृत्य केले.  
ग्वाल्हेरमध्ये कार्तिक ९० दिवस राहणार आहे. क्रिती सॅनन त्याची हिरोईन आहे. ‘लुका छिपी’त कार्तिकला एका स्थानिक टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. गत आठवड्यात या चित्रपटाचे फर्स्ट लूक व्हायरल झाले होते. यात कार्तिक व क्रिती दोघेही वधू-वराच्या पोशाखात दिसले होते.

Web Title: Kartik Aaryan overwhelmed with the warm welcome from his hometown Gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.