Karisma Kapoor quotes from 'Chhori' after Parineeti Chopra | परिणीती चोप्रानंतर आता करिश्मा कपूर ‘छत्री’मुळे वादात

बॉलीवूड स्टार झाल्यावर लोकांचे नखरे वाढतात असे म्हणतात. स्टारडम, फेम, लोकप्रियतेची हवा डोक्यात गेल्यावर अनेकांना सामाजिक भान आणि संवदेनशीलता दाखवता येत नाही. असाच प्रसंग करिश्मा कपूरसोबत घडला आणि तिच्या असंवेदनशील वागण्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोलिंगची शिकार ठरत आहे.

त्याचे झाले असे की, करिश्मा दुबईमध्ये लहान मुलांच्या आरोग्यसंदर्भात कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी पावसाची भुरभुर सुरू झाली. तेव्हा करिश्माने आयोजकांना सांगून एका महिलेला तिच्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी मागे उभे केले. करिश्मा स्वत:देखील छत्री पकडू शकत होती मात्र तिने राजेशाही थाटात एका महिलेला केवळ छत्री पकडण्यासाठी उभे केल्यामुळे तिच्यावर टीकेचे झोड उठलेली आहे.

ALSO READ: करिश्मा कपूरच्या ‘बॉयफ्रेन्ड’ने पत्नीला ठरवले मानसिक रूग्ण?

फोटोत करिश्मा सोफ्यावर बसलेली आहे. तिच्या मागे उभे राहून एका महिलेने तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असून करिश्मा कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देत आहे. विशेष म्हणजे करिश्माने स्वत: हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. ' या फोटोवर लोक कमेंट करून तिच्या ‘हाय स्टँडर्ड’चा खरपूस समाचार घेत आहेत. या सेलिब्रेटींनी स्वत:ची छत्री पकडण्यात कसला कमीपणा वाटतो, ते स्वत:ला समजतात तरी काय? अशी टीका नेटिझन्स करीत आहेत.

 

मागे परिणीती चोप्रानेदेखील असाच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये उन्हात एका व्यक्तीने तिच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. काळ्या ड्रेसमध्ये डोळ्यावर गॉगल लावून चालणारी परिणीती तो व्यक्ती स्वत: उन्हात आहे याकडेही लक्ष देत नाहीए म्हणून तिच्यावर टीका झाली होती.

ALSO READ: वाढदिवसाच्या संदेशामुळे परिणीती चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्रोलिंग वाढल्यानंतर परिणीतीने तो व्हिडिओ डिलिट केला होता. यापूर्वी सोशल मीडियावर  मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिने ‘कमी खा आणि बारीक हो’ असा सल्ला दिला होता. त्यावरूनही तिच्या ‘फॅट शेमिंग’चा आरोप करण्यात आला होता.

तुम्हाला काय वाटते, स्टारमंडळींनी स्वत:ची छोटी-छोटी कामे करण्यासाठी इतर माणसांना गुलामांसारखे कामाला जुंपले पाहिले का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.
Web Title: Karisma Kapoor quotes from 'Chhori' after Parineeti Chopra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.