काल १५ फेबु्रवारीला ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांचा ७१ वा वाढदिवस साजरा झाला. रणधीर यांच्या दोन्ही मुली करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांनी आपल्या पापाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला. करिना व करिश्माने  पापासाठी खास बर्थ डे पार्टी आयोजित केली होती.कपूर घराण्याच्या काही सदस्यांसह रणधीर यांचे काही खास मित्र यापार्टीत सामील झाले होते. रणधीर कपूर यांच्या पार्टीत सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो त्यांनी कापलेला केक.होय, कारण या केकवर  करिना व करिश्माचे नाही तर समायरा, कियान आणि तैमूर यांच्या नावाचे लहान लहान फ्लॅग होते. ‘हॅपी बर्थ डे नाना, वी लव यू,’ असे यावर लिहिलेले होते. आता हा केक कापताना रणधीर कपूर किती आनंदी झाले असतील, हे सांगायला नकोच.या पार्टीचे काही फोटो तुम्ही येथे पाहू शकता. करिना, करिश्मा यांचा ग्लॅमरस अंदाजही तुम्ही या फोटोत पाहू शकतात.करिनाचा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर या पार्टीत नव्हते. पण करिनाने त्या दोघांचीही कसर भरून काली. रणधीर यांची पत्नी बबीता आणि भाऊ ऋषी कपूर, नीतू सिंग या पार्टीत हजर होते. रणधीर यांचे सर्वात लहान भाऊ राजीव कपूरही पार्टीत दिसले. करिश्माची दोन्ही मुले समायरा व कियान हेही पार्टीत दिसले. ALSO READ : करिश्मा व करिनाने दत्तक घ्यावे, अशी आहे रणधीर कपूर यांची इच्छा!!

१९७२ मध्ये आलेला ‘जवानी दीवानी’ आणि ‘रामपूर का लक्ष्मण’ शिवाय १९७४ मध्ये आलेला ‘हाथ की सफाई’ हे रणधीर यांचे चित्रपट प्रचंड गाजलेत.  १९९१ मध्ये आलेला ‘हिना’ हा रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट.   मुलींनी अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येऊ नये, असे रणधीर कपूर यांचे एकेकाळी मत होते. पण आज त्यांना आपल्या दोन्ही मुलींचा अभिमान वाटतो. एका मुलाखतीत रणधीर यावर बोलले होते. माझ्या दोन्ही मुली त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत, आनंदी आहेत. माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत, याचा मला अभिमान आहे. तुम्ही इतक्या श्रीमंत आहात, मग मला दत्तक घेऊन घ्या, असे अनेकदा मी माझ्या मुलींना म्हणतो, असे रणधीर यांनी सांगितले होते. 
Web Title: Karisma and Karina celebrate such a special festivity, the birthday of father Randhir Kapoor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.