Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही !

By सुवर्णा जैन | Published: September 14, 2018 02:37 PM2018-09-14T14:37:05+5:302018-09-16T08:00:00+5:30

मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे.

 Karenjit Kaur - The Untold Story Season 2: Sunny Leone Didnt had any Repent About Her past | Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही !

Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही !

googlenewsNext

सुवर्णा जैन

ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्ष: वेड लावलं आहे. बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप.. ही ती म्हणजे पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी. तिच्या करनजीत 'कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या वेबसिरीजला रसिकांनी डोक्यावर घेतलं. लवकरच याचा दुसरा सीझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्त सनी लिओनी हिच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.

'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या वेबसिरीजला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला. कसं वाटतं हा प्रतिसाद पाहून आणि याचा लवकरच दुसरा सीझन येतोय. तर त्यात काय वेगळेपण असेल?

मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनीचा पहिला सीझन इतका आवडेल. लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. आता आशा आहे की पहिल्या सीझनप्रमाणेच करनजीत कौरच्या दुसऱ्या सीझनलाही रसिकांची पसंती मिळेल. पहिल्या सीझनमध्ये रसिकांना यातील व्यक्तीरेखा कळल्या. दुसऱ्या सीझनमध्ये या व्यक्तीरेखांची रसिकांना प्रत्यक्ष स्वानुभूती मिळेल. रसिक या भूमिका जगतील, त्यांना त्या स्वतःच्या आयुष्याशी निगडीत वाटतील.

दुसऱ्या सीझनमधून रसिकांना काय पाहायला मिळणार आहे?

दुसऱ्या सीझनमध्ये करनजीतच्या आयुष्यातील अनेक चढउतार पाहायला मिळतील. हे चढउतार तिचे आयुष्याला कशारितीने कलाटणी देतात हे दाखवण्यात आलं आहे. जे काही घडलं ते चांगल्यासाठी किंवा त्यातून काही वाईट घडलं ते सगळं या दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळेल. या सीझनमध्ये जे काही आहे ते रिअल दाखवावं असं माझं स्पष्ट मत होतं. दुसऱ्या सीझनमध्ये जे काही तुम्ही पाहाल त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्या आहेत, रिअल आहेत. त्यात काहीही काल्पनिक नाही.

करनजीतचं स्ट्रगल या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र मागे वळून पाहाताना भूतकाळातील कोणत्या गोष्टी तुला बदलाव्या असं वाटतं?

माझ्या जीवनात आजवर ज्या काही गोष्टी घडल्या, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, त्याच गोष्टींमुळे मी जी आज आहे ती आहे. याच चांगल्या वाईट गोष्टींमुळे माझ्या जीवनात बदल होत गेला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांना आपण काहीच करु शकत नाही. जसं की मला वाटतं की माझ्या आईवडिलांनी मला कधीच सोडून जाऊ नये. मात्र देवाच्या इच्छेपुढे काहीच चालत नाही. मात्र एक खरं आहे की माझ्या जीवनात जे काही घडलं त्यामुळे माझ्या जीवनात, जगण्यात आमूलाग्र बदल घडला. या चांगल्या वाईट गोष्टींमुळेच माझ्यात बदल घडवला. मात्र खरंच माझ्याकडे जादू असती तर माझ्या आईवडिलांना मी पुन्हा माझ्या आयुष्यात घेऊन आली असती.


बॉलीवुडमध्ये कोणत्या कलाकारासह तुला काम करण्याची इच्छा आहे आणि का ?

माझ्यासोबत ज्यांना काम करायचं त्यांच्यासोबत मला काम करायचं, इतकं सोपं आहे. मी यावर जास्त विचार करत नाही. मी खूप रिअॅलिस्टिक आहे. जे माझ्या ताटात वाढलं आहे ते खायला आवडतं. तसंच माझ्यासोबत ज्यांना काम करायचं त्यांच्यासोबत मला काम करायला आवडेल. मात्र भारतातच नाही तर जगातील कोणत्या कलाकारासोबत काम करायचं असं विचारलं तर माझं उत्तर एकच असेल आमीर खान. बऱ्याच वर्षांपासून मी आमिरचे सिनेमा पाहते. जशा लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही प्रश्न किंवा सवाल आहेत तशाच त्या आमिरबद्दलही आहेत. मात्र प्रत्यक्ष आमिरला भेटले त्यावेळी तो पूर्णपणे वेगळा वाटला. सगळ्यांना मदत करणारा, आदर देणारा, नम्र, उदार आणि काळजी घेणारा असा आमीर आहे. त्याच्या या सगळ्या गोष्टी मला भावतात.


आज तुझं कुटुंब पूर्ण झालं आहे. कुटुंबासह वेळ घालवणं, त्यांना वेळ देणं कितपत आवडतं आणि आई म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणं किती आव्हानात्मक आहे ?

नुकतंच आम्ही दुबईहून परतलो आहोत. आमची पहिली कौटुंबिक सुट्टी. मला माझं कुटुंब प्रिय आहे. कुटुंबासाठी जगायला मला आवडते. कुटुंबासाठी वेळ देताना दमछाक होते कधी कधी मात्र त्यातही खरंच खूप वेगळी मजा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आईची जबाबदारी तर आपल्या मुलांसाठी म्हणजे आईचं कर्तव्य निभावताना कोणतीही आई त्यातील अडचणींचा कधीच विचार करत नाही. माझं हे मत कदाचित अनेक मातांना पटेल. कारण आई झालात की तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्या सोप्या आहेत की अवघड आहेत याचा विचार कोणतीच आई करत नाही. उदाहरणार्थ डायपर बदलणं, बाळाला झोपवणं या गोष्टी आईला कराव्याच लागतात. मग त्या सोप्या कठीण असा विचार कुणीही करत नाही. त्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आणि पूर्णतः नैसर्गिक आहेत असं मला वाटतं.

डॅनिअलचा तुझ्या जीवनात महत्त्वाचं योगदान आहे. तुझं आणि डॅनिअलचं नातं कसं आहे?

खरं सांगायचं तर डॅनिअल माझ्यासाठी खरा आधारस्तंभ ठरला. ज्यावेळी माझं आयुष्य अंधकारमय झालं होतं, त्यावेळी तो माझ्या जीवनात आला. कठीणसमयी अनेकजण तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी डॅनिअल खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा राहिला. आमची जेमतेम दोन महिन्यांची ओळख होती. मात्र कशाचाही मागचा पुढचा विचार न करता त्याने माझ्या चांगल्या वाईट काळात माझी साथ निभावली. याच वेळी तुम्हाला तुमच्या जीवनातील व्यक्तींची खरी ओळख कळते.

सनी लिओनीचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? असेल तर तिला पुढच्या जन्मात कोण म्हणून जन्माला यायला आवडेल ?

पुढच्या जन्मी मला मी स्वतःच बनायला आवडेल. आजवरील माझं आयुष्य जबदरस्त होते. सुंदर आयुष्य, सुंदर कुटुंब, जीवाला जीव देणारे कुटुंबीय, माझा नवरा, मुलं, माझं आजवरील काम आणि सारं काही आनंदी आनंद. हेच पुन्हा मला जगायला आवडेल. मात्र माझ्या आईवडिलांना खूप खूप मिस करते.  

तुझं तुझ्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे. मात्र तुझ्या मुलांनी काय करावं असं तुला वाटतं? त्यांच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत ?

माझ्या मुलांनी काय करावं हे मी त्यांना सांगणार नाही. त्यांना जे आवडेल, त्यांना जे काही शिकायचे ते त्यांनी शिकावं. त्यांना शिक्षक व्हायचं किंवा आणखी काही ते त्यांनी बनावं. माझ्यासाठी या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक चांगलं माणूस बनावं. त्यांना पैशांची किंमत असावी आणि मेहनत करावी हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.  

तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि रसिकांना काय आवाहन करशील?
 

येत्या वर्षात एका नव्या सिनेमाचं शुटिंग करणार आहे, तसंच करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनीचा दुसऱ्या सीझनबाबत बरीच एक्साईटेड आहे, त्याशिवाय अजून काही प्रोजेक्टबाबत चर्चा सुरु आहे. रसिकांना माझं हेच सांगणं आहे की त्यांनी करनजीत कौर – द अनडोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनीचा पहिला सीझन पाहावा आणि सोबतच दुसरा सीझनही तितका एन्जॉय करावा.

Web Title:  Karenjit Kaur - The Untold Story Season 2: Sunny Leone Didnt had any Repent About Her past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.