Kareena Kapoor's worth reading this jacket! | करिना कपूरच्या या जॅकेटची किंमत वाचून व्हाला थक्क!

फॅशनच्या जगात करिना कपूरचे नाव नेहमीच आघाडीवर असते. करिनाने केलेली फॅशन आजच्या तरुणाई सरस फॉलो करताना दिसते. करिनाने तैमूरच्या जन्मानंतर वाढलेले बरचं वजन कमी केले आहे. आई झाल्यानंतर ही करिनाने काम करणं थांबवले नाही आहे. वीरे दी वेडिंग हा करिनाचा आई झाल्यानंतरचा पहिला चित्रपट आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग देखील एन्जॉय करते आहे.   

सध्या ती राय कपूर आणि एकता कपूर निर्मिती वीरे दी वेंडिगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच करिना कपूर शूटिंगसाठी एअरपोर्टवर जातानाचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवले होते. यावेळी तिने परिधान केलेल्या डेनिम जॅकेटची किंमत माहिती आहे का?, बॉलिवूडचे  बहुतेक सर्वच कलाकार महागडे आणि डिझायनर्स कपडे वापरतात. करिनाच्या  जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही एक डोमेस्टिक ट्रीप करुन येऊ शकता.  करिनाचा हा जॅकेट तब्बल 84 हजाराचा आहे.     करिना शूटिंगसाठी थायलँडला रवाना झाली आहे. करिना वीरे दी वेडिंगसाठी स्पेशल गाण्यांचे शूटिंग करणार आहे. करिना आणि चित्रपटाची इतर टीम जवळपास 10 दिवस इकडेच राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाण्यात चित्रपटाची कास्ट बीचवर पार्टी करताना दिसण्याची शक्यता आहे. 

ALSO READ :  लग्नासाठी करिना कपूर खानने सैफ अली खानला घातली होती ही अट

याचित्रपटाचा काही दिवसांपूर्वी पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंशाक घोष करतो आहे. यात करिनासोबत रोमांस करताना सुमीत व्यास दिसणार आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग दिल्लीतच होणार आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाची कथा चार मुलींच्या भवती फिरणारी आहे. वीरे दी वेडिंग'मध्ये करिना   एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे. करिनाचे फॅन्स ती मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यामुळे ते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. हा चित्रपट पुढच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Kareena Kapoor's worth reading this jacket!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.