ही आहे करीना कपूरच्या रेडिओ शोची पहिली गेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:26 PM2018-09-27T14:26:10+5:302018-09-27T14:27:00+5:30

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर रेडिओ क्षेत्रात आपले नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे.

This is Kareena Kapoor's first show of radio show | ही आहे करीना कपूरच्या रेडिओ शोची पहिली गेस्ट

ही आहे करीना कपूरच्या रेडिओ शोची पहिली गेस्ट

ठळक मुद्देपहिल्यांदाच करीना कपूर व सनी लियोन एकत्र


बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर रेडिओ क्षेत्रात आपले नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती रेडिओ १०४.८ एफएमवर शो होस्ट करणार आहे. या शोच्या पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग तिने पूर्ण केले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
 करीनाचा हा शो डिसेंबरमध्ये ऑन एअर जाणार आहे. या शोची पहिली गेस्ट सनी लियोन असणार आहे. या शोमध्ये ती तिच्या खासगी आयुष्य व चित्रपटाबद्दल बोलणार आहे. पहिल्यांदाच करीना कपूर व सनी लियोन एकत्र येणार आहेत. करीनाने नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून लिहिले की,लवकरच मी भेटणार रेडिओवर आरजे या नव्या अवतारात.



करीनाच्या आधी निर्माता -दिग्दर्शक करण जोहर रेडिओवर आपले नशीब आजमावले आहे. या शोचे नाव कॉलिंग करण असे होते. तैमूरच्या जन्माच्या सुमारे दोन वर्षांनंतर करिना कपूर खानने रूपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली. करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हिट झाला. या चित्रपटानंतर करिनाकडे सध्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. यातील करण जोहरचे ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ हे दोन सिनेमे तिने साईनही केले आहेत. लवकरच करिना आणखी काही बिग बॅनरचे चित्रपट साईन करणार आहे. 

 

Web Title: This is Kareena Kapoor's first show of radio show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.