तैमुरचे हे व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 01:08 PM2018-09-19T13:08:17+5:302018-09-19T13:10:17+5:30

करिनाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच Taimur चे काही व्हिडिओ शेअर केले असून या व्हिडिओंना नेटिझन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तैमुर त्याचा मामा आदार जैन सोबत खेळताना दिसत आहे.

Kareena kapoor shares taimur new video on instagram | तैमुरचे हे व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

तैमुरचे हे व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

googlenewsNext

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याची छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रियतेत जराही कमी आलेली नाही. करिना आणि सैफ देखील आपल्या या लाडक्या मुलाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना सैफचे आणि करिनाचे चाहते भरभरून प्रतिसाद देतात.

करिनाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच तैमुरचे काही व्हिडिओ शेअर केले असून या व्हिडिओंना नेटिझन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तैमुर त्याचा मामा आदार जैन सोबत खेळताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने करिना आणि तिची आत्या रिमा जैन यांचे कुटुंबीय एकत्र आले होते. त्यावेळी हे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत सत्तर हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


 

तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. करीना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर खूप लहान असला तरी खूप लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो. सैफ करीना तैमूरला जास्त अटेंशन मिळत असल्यामुळे थोडे त्रस्त आहेत. याबाबत करीनाने सांगितले की, मला वाटते की तैमूरला गरजेपेक्षा जास्त अटेंशन मिळत आहे. तैमूरदेखील इतर लहान मुलासारखे साधारण मोठा व्हावा, असे आम्हाला वाटते.


 

तैमूरसाठी करीना कपूर दोन वर्षे बॉलिवूडपासून दूर होती. दोन वर्षानंतर करीनाने वीरे दी वेडिंगमधून पुनरागमन केले. यातील तिने साकारलेली वीरेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. आता ती करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसणार आहे.


 


 

Web Title: Kareena kapoor shares taimur new video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.