तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाच्या पगाराबाबत बेगम करीनाचा खुलासा, काय बोलली बेबो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:52 PM2019-03-13T12:52:17+5:302019-03-13T12:52:42+5:30

तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया.

kareena kapoor Reaction On Son Taimur Ali khan Nanny Salary | तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाच्या पगाराबाबत बेगम करीनाचा खुलासा, काय बोलली बेबो?

तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाच्या पगाराबाबत बेगम करीनाचा खुलासा, काय बोलली बेबो?

googlenewsNext

स्टार किड्सपैकी सगळ्यात चर्चित चेहरा म्हणजे छोटे नवाब तैमूर अली खान. तैमूरच्या बाल लीला अशा काही आहेत की तो नेहमीच चर्चेत असतो. चिमुकल्या तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. या फोटो आणि व्हिडीओंना तुफान लाईक्सही मिळतात. त्यामुळे सध्या बी-टाऊनच्या बातम्यांमध्ये तैमूरची जबरदस्त क्रेझ आहे. तैमूरच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या फॅन्सच्या नजरेतून एक गोष्ट चुकली नसावी. तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया.

तैमूरची आया तैमूरप्रमाणेच लोकप्रिय होत आहे. तैमूरच्या आयाचा महिन्याचा पगार तब्बल दीड लाख रुपये इतका आहे. कधी कधी महिन्याच्या पगाराची ही रक्कम पावणे दोन लाखांच्या घरात पोहचते. नुकतेच करिना कपूरने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिला तैमुरच्या आयाच्या पगारावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने पहिल्यांदाच यावर आपले स्पष्ट मत मांडले. करिनाने म्हटले की, सगळ्यांत आधी चांगल्या व्यक्तीने मुलांचा सांभाळ करणे गरजेचे आहे. पैशाला महत्त्व देण्यापेक्षा सुरक्षित व्यक्तीच्या हातात आपली मुलांची जबाबदारी  सांभाळणे गरजेचे आहे.  माझ्या मुलाचा सांभाळ करणा-या आयाला मी किती पगार देते या गोष्टी बाहेर येतातच कशा हाच मला प्रश्न पडतो.   

कपूर कुटुंबीयांना तैमूरसाठी ही आया जुहूमधील एका खासगी एजन्सीमार्फत पुरवण्यात आली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी याच एजन्सीमार्फत मेड सेवा पुरवली जाते. दररोर सकाळी उठलं की वर्तमानपत्रात तैमूरचा फोटो पाहायला मिळतो. यामुळंच की काय आता तैमूरची आया कोण आहे हेही साऱ्यांना माहित झालं आहे, ते फक्त तैमूरवर माध्यमांची नजर असल्यामुळेच”. 

Web Title: kareena kapoor Reaction On Son Taimur Ali khan Nanny Salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.