Kareena Kapoor to make Madhubala? | करिना कपूर साकारणार का मधुबाला?

सौंदर्याची व्याख्या जर कोणी विचारली तर त्याला उत्तर असेल एकच नाव ते म्हणजे मधुबाला हिचे. अशी अभिनेत्री आजपर्यंत झाली नाही आणि होणार पण नाही.  जर तिच्या आयुष्यावर  चित्रपट करायचे ठरवले तर कोणती अभिनेत्री तिची भूमिका साकारु शकते असा प्रश्न तिच्या लहान बहिणीला एक मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले करिना कपूर खान. ती म्हणाली की करिनामध्ये तोच खोडकरपणा दिसून येतो जो मधुबाला मध्ये होता, मला एक वेळेस वाटत होते की माधुरी दीक्षित मधुबालाच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे पण आता विचाराल तर मी करिनाचे नाव सुचवेन. 

जर ही गोष्ट खरंच घडली तर बेबो आपल्याला स्क्रिनवर मधुबाला साकारताना दिसेल. बेबोने आतापर्यंत चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.  कभी खुशी कभी गममधली शिष्ट मुलगी, की अँड का मधली स्वाभिमानी स्त्री किंवा जब व्ही मेटमधली वेडी गीत असो तिने यासारख्या विविध छट्या असलेले रोल उत्तम साकारले आहे. मधुबालाची भूमिका ही करिना तेवढ्याच ताकदीनं साकार करेल असा विश्वास त्यांच्या फॅन्सना आहे.  

ALSO READ : मॅडम तुसादमधील मधुबालाचा ‘नुरानी’ अंदाज पाहिलातं?

सध्या करिना पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत स्वित्झर्लंडमध्ये जाऊन व्हेकेशन एन्जॉय करत आहे. यानंतर ती वीरे दि वेडिंगच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तिचा हा चित्रपट डिसेंबर 2016 पासून रखडला आहे. याचित्रपटाचे  शूटिंग जास्त करुन दिल्लीमध्ये होणार आहे. सप्टेंबरपासून करिना या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यात करिनासह सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
Web Title: Kareena Kapoor to make Madhubala?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.