Kareena Kapoor left the Hindi remake of 'Your Man', the actress got the advantage | करिना कपूरने सोडला 'आपला माणूस'चा हिंदी रिमेक, या अभिनेत्रीला झाला फायदा

करिना कपूरने तैमूर अली खानच्या जन्मानंतर 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केला आहे. करिनाच्या 'वीरे दी वेडींग'ने बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाण घेतली आहेत. वीरे दी वेडिंगची कमाई बघून समीक्षकांनी तिची दुसरी इनिंगही यशस्वी होणार. वीरे दी वेडिंगनंतर करिना कुठल्या चित्रपटात दिसणार याची वाट तिचे चाहते मोठ्या आतुरतेने बघतायेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडे नव्या-नव्या चित्रपटाच्या ऑफर्स येतायेत.  
 
करिनाला मराठी चित्रपट आपला माणूसच्या हिंदा रिमेकची ऑफर आली होती. ज्या चित्रपटाची निर्मिती आशुतोष गोवारिकर करणार आहे. याबाबत आशुतोषने करिनाशी चर्चा केली आहे. मात्र करिनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे करिना आपला माणूसच्या रिमेकचा भाग नसणार आहे.    

डीएनएच्या रिपोटनुसार, चित्रपटात जे बदल करण्यात आले ते करिनाला फारसे रुचले नाहीत. ती लवकरच राज मेहता दिग्दर्शित चित्रपटात झळकणार आहे. ज्यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. करिनाने नकार दिल्या नंतर आशुतोष या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाशी चर्चा करतो आहे. सोनाक्षीला या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे त्यामुळे आता आपला माणूसच्या रिमेकमध्ये आपल्याला सोनाक्षी सिन्हा दिसण्याची शक्यता आहे. 

ALSO READ :   तुम्हाला माहित आहे का करिना कपूरने नाकारलेत हे दोन ब्लॉकबस्टर सिनेमे?

सोनाक्षीचे फिल्मी करिअर गेल्या काही काळापासून फारसे सुस्थितीत नाही. तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत असल्याने तिला एका सुपरहिटची अत्यंत आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा चित्रपटदेखील बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे सोनाक्षी सध्या हिट चित्रपटाच्या शोधात आहे आणि हा चित्रपट यशस्वी झाला तर सोनाक्षीच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळेल. 
Web Title: Kareena Kapoor left the Hindi remake of 'Your Man', the actress got the advantage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.