Kareena Kapoor Khan's Denim Jacket | करिना कपूर खानचा डेनिम जॅकटमधला खल्लास करणारा अंदाज

सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर ही करिना कपूरच्या फॅन्स फॉलोव्हिंगमध्ये जराही कमतरता आलेली नाही. उलट दिवसांदिवस तिच्या फॅन्सची संख्या वाढत चालली आहे. नुकतेच करिनाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळी करिनाने नीळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातलेले होते. करिनाने लाल रंगाची लिपस्टीक लावली आहे जी तिच्या सौंदर्यात चार चाँद लावते आहे.   करिनाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना खल्लास करणारा आहे. करिनाला जास्त करुन लाईट मेकअप करणे पसंत असल्याचे ती एक इंटरव्ह्रु दरम्यान म्हणाली होती. नेहमी तिला सिम्पल रहायला आवडत असल्याचे ती म्हणाली होती. फक्त ब्राईट कलरची लिस्पटिक लावणे करिनाला आवडते.    

करिना फुकेटसाठी रवाना झाल्याचे समजते आहे. मात्र यावेळी करिना एकटीच एअरपोर्टवर दिसली तिचा लाडका तैमूर करिनासोबत नव्हता. तो कदाचित डॅडी सैफसोबत घरीच थांबवला असावा. फुकेटला करिना तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगसाठी स्पेशल गाण्यांचे शूटिंग करणार आहे. करिना आणि चित्रपटाची इतर टीम जवळपास 10 दिवस इकडेच राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाण्यात चित्रपटाची कास्ट बीचवर पार्टी करताना दिसण्याची शक्यता आहे. 

ALSO READ :   छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!
 
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंशाक घोष करतो आहे. यात करिनासोबत रोमांस करताना सुमीत व्यास दिसणार आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग दिल्लीतच होणार आहे.  वीरे दी वेडिंग चित्रपटाची कथा चार मुलींच्या भवती फिरणारी आहे. वीरे दी वेडिंग'मध्ये करिना   एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’ सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे.  रिया पहिल्यांदा करिनाकडे या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेली. तेव्हा करिनाने या चित्रपटाला नकार दिला होता. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द करिनाने हा किस्सा सांगितला होता. 
Web Title: Kareena Kapoor Khan's Denim Jacket
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.