Confirmed! लाल सिंग चड्ढामध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री बनणार आमिर खानची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:04 PM2019-06-22T13:04:18+5:302019-06-22T13:21:15+5:30

आमिरच्या लाल सिंग लड्ढा या चित्रपटाची घोषणा होऊन कित्येक महिने झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते.

Kareena Kapoor Khan to star alongside Aamir Khan in Laal Singh Chaddha | Confirmed! लाल सिंग चड्ढामध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री बनणार आमिर खानची नायिका

Confirmed! लाल सिंग चड्ढामध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री बनणार आमिर खानची नायिका

ठळक मुद्देलाल सिंग लड्ढा या चित्रपटात करिना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. करिनाच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या टीमकडून केली जाणार आहे.

आमिर खानने काही महिन्यांपूर्वी म्हणजेच त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. 

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटासाठी तो तब्बल २० किलो वजन कमी करणार आहे. आमिरच्या प्रोडक्शन हाऊसने ‘फॉरेस्ट गम्प’ चे हक्क खरेदी केले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे लेखन अभिनेता अतुल कुलकर्णी करत आहे.

आमिरच्या लाल सिंग लड्ढा या चित्रपटाची घोषणा होऊन कित्येक महिने झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात करिना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. करिनाच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या टीमकडून केली जाणार आहे.

आमिर आणि करिना यांनी एकत्र काम करण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्यांनी याआधी थ्री इडियट्स, तलाश यांसारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. करिना सध्या अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण करत असून ती अक्षय कुमारसोबत गुड न्यूज या चित्रपटात देखील झळकणार आहे. तसेच तख्त या बिग बजेट चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. 
 

Web Title: Kareena Kapoor Khan to star alongside Aamir Khan in Laal Singh Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.