Kareena Kapoor-Khan made 'Oh' statement about Ladur! | करिना कपूर-खानने लाडक्या तैमूरविषयी केले ‘हे’ वक्तव्य!

आई झाल्यानंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून कमबॅक करणारी अभिनेत्री करिना कपूर-खानने तिच्या चिमुकल्या तैमूरविषयी म्हटले की, आता मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तैमूरचा विचार करून घेत आहे. एका एयर प्युरीफायर ब्रॅण्डची दूत बनलेल्या करिनाने म्हटले की, ‘तैमूर माझा आत्मा आहे. माझे हृदय आता माझ्यात नव्हे तर तैमूरमध्ये धडकते. त्यामुळे आता मी माझ्या आयुष्यात जे काही करणार, ते तैमूरचा विचार करूनच करेल. माझा परिवार, माझे मित्र आणि माझ्या टीमला हे सर्व माहीत असायला हवे, असेही करिना म्हणाली. 

यावेळी करिनाने हेदेखील स्पष्ट केले की, ती अशा प्रॉडक्ट्सचे काम करणार नाही ज्याचा ती वापर करू शकणार नाही. करिनाने म्हटले की, ‘सुरुवातीपासूनच प्रॉडक्ट्सच्या प्रचाराविषयी मी चूजी राहिली आहे. आई झाल्यानंतर मी अधिकच सतर्क झाली आहे. मी कधीच अशा प्रॉडक्ट्सचा प्रचार करणार नाही, ज्याचा वापर मी आणि माझ्या परिवाराला करता येणार नाही. यावेळी करिना म्हणाली की, मी या प्रॉडक्टशी यामुळे जुळले जेणेकरून लोकांमध्ये मला याबाबतची जागरूकता करता येईल. कारण घरामधील प्रदूषण, बाहेरच्या प्रदूषणापेक्षा अधिक धोकादायक ठरत आहे. 

बॉलिवूडमध्ये २००० या वर्षात ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून पाऊल ठेवणारी करिना उद्या तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. करिनाला जेव्हा तिच्या बर्थ डे प्लॅनविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘याबाबतची अद्यापपर्यंत कुठलेही प्लॅनिंग केलेले नाही. मुंबईमध्ये खूप पाऊस होत आहे. कदाचित यामुळे विमानसेवाही खंडित होऊ शकतात. अशात आम्ही कुठलेही प्लॅनिंग केलेले नाही. जर उद्या वातावरण सामान्य राहिले तर परिवारासोबत वाढदिवस साजरा करणार. 

सहा फिल्म फेअर पुरस्कार जिंकणारी करिना आता ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याविषयी बोलताना करिना म्हणाली की, ‘आतापर्यंत आम्ही केवळ २० ते २० टक्केच भाग शूट केला आहे. चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याने, आमच्याकडे बराच वेळ आहे. चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर, एकता कपूर, रिया कपूर आणि निखिल आडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: Kareena Kapoor-Khan made 'Oh' statement about Ladur!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.