बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासोबतच आपल्या कुटुंबासोबतही बिझी आहे. मंगळवारी करिना अशाच एका इव्हेंटमध्ये संपूर्ण कुटुंबासह दिसली. (अर्थात तैमूर अली खान या इव्हेंटमध्ये नव्हता.) निमित्त होते, करिनाची नणंद सोहा अली खान हिच्या पहिल्या-वहिल्या पुस्तकाचे प्रकाशन.होय, करिनाची नणंद सोहा अली खान अभिनेत्री तर आहेच. पण आता ती लेखिका म्हणूनही ओळखली जाणार आहे. काल सोहाने लिहिलेल्या ‘ द पेरिल्स आॅफ बीर्इंग मॉडरेटली फेमस’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करिनाशिवाय सोहाचा पती कुणाल खेमू, आई शर्मिला टागौर, भाऊ सैफ अली खान, बहीण सबा अली खान असे सगळे हजर होते. पण यात सर्वांच्या नजरा टिकल्या त्या करिना कपूर खानवर.होय, करिना या इव्हेंटला अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचली. बिभू मोहमात्राने डिझाईन केलेला फ्रंट कट ड्रेस करिनावर चांगलाच खुलून दिसत होता. यावर ब्लॅक हिल्स आणि न्यूड लिपस्टिक असा तिचा लूक होता.यावेळी करिना सोहाबद्दल भरभरून बोलली. मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागौर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच घर सांभाळू शकते. आम्ही सहकुटुंब एकत्र असलो की, सोहा आणि सैफ यांच्या गोष्टी मला अजिबात कळत नाही. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप्स करू शकते. पण यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे, याची जाणीव मला होते, असे करिना म्हणाली.ALSO READ : अखेर दिसला सोहा अली खानची लेक इनायाचा चेहरा! 

सोहा अली खान हिनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. मी इतक्या मोठ्या कुटुंबाचा भाग आहे, हीच माझी ओळख आहे आणि ही ओळख नाकारण्याचे काहीही कारण नाही. मी बॉलिवूडमध्ये आले तेव्हा सैफची बहीण म्हणून मला ओळखले गेले. पण हीच माझी ओळख आहे. यावरून त्रागा करण्याचे कारण नाही, असे सोहा म्हणाली.
Web Title: Kareena Kapoor Khan has reached such a bold figure in Nandand Soha Ali Khan's 'Book Launch'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.