‘बेबो’ करिना कपूर बनली ‘रेडिओ जॉकी’, पाहा, ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:04 PM2018-12-07T16:04:03+5:302018-12-07T16:05:01+5:30

‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ हे धर्मा प्रॉडक्शनचे दोन सिनेमे करिना कपूरने साईनही केले आहेत. पण त्याआधी करिना ‘रेडिओ जॉकी’ बनून चाहत्यांसमोर येणार आहे.

Kareena Kapoor Khan to debut as RJ with ‘What Women Want’ |  ‘बेबो’ करिना कपूर बनली ‘रेडिओ जॉकी’, पाहा, ट्रेलर!!

 ‘बेबो’ करिना कपूर बनली ‘रेडिओ जॉकी’, पाहा, ट्रेलर!!

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे करिनाने स्वत: या रेडिओ शोबद्दल खुलासा केला होता. करिनाकडे रेडिओ शोची आॅफर येताच, तिने सर्वप्रथम करण जोहरचा सल्ला घेतला होता.

तैमूरच्या जन्माच्या सुमारे दोन वर्षांनंतर ‘बेबो’ करिना कपूर खानने रूपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली. करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हिट झाला. या चित्रपटानंतर करिनाकडे सध्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. यापैकी ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ हे धर्मा प्रॉडक्शनचे दोन सिनेमे तिने साईनही केले आहेत. पण त्याआधी करिना ‘रेडिओ जॉकी’ बनून चाहत्यांसमोर येणार आहे. होय, मित्र करण जोहरच्या पावलावर पाऊल ठेवत करिना रेडिओवर डेब्यू करतेय. इश्क104.8 एफएम या रेडिओ वाहिनीवर येत्या १० डिसेंबरपासून ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ नामक करिनाचा रेडिओ चॅट सुरू होतोय. या शोचे खास वैशिष्ट्य म्हणजे, करिनाच्या या शोमध्ये बहीण करिश्मा कपूर, नणंद सोहा अली खान, जवळची मैत्रिण अमृता अरोरापासून सनी लिओनीपर्यंत अनेकजणी सहभागी होणार आहेत. एक महिला म्हणून त्यांना काय हवय, हे या सर्वजणी सांगणार आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा हाही करिनाच्या रेडिओ शोमध्ये हजेरी लावणार आहे.

 नुकताच करिनाच्या या रेडिओ चॅट शोचा ट्रेलर रिलीज झाला. करिनाच्या चाहत्यांनी तरी हा ट्रेलर एकदा पाहायलाच हवा.


अलीकडे करिनाने स्वत: या रेडिओ शोबद्दल खुलासा केला होता. करिनाकडे रेडिओ शोची आॅफर येताच, तिने सर्वप्रथम करण जोहरचा सल्ला घेतला होता. कारण करण सध्या एक रेडिओ शो होस्ट करतोय. साहजिकचं करणच्या प्रोत्साहनानंतर करिना या शोसाठी राजी झाली. आता बेबोच्या या रेडिओ शोला किती प्रतिसाद मिळतो, ते पाहूच. 

Web Title: Kareena Kapoor Khan to debut as RJ with ‘What Women Want’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.