सारा अली खानचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना, तिच्या पदार्पणासाठी देणार पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:36 AM2018-12-11T10:36:41+5:302018-12-11T10:45:19+5:30

अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे.

Kareena Kapoor impressed by Sara Ali khan debut acting, kareena gives party | सारा अली खानचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना, तिच्या पदार्पणासाठी देणार पार्टी

सारा अली खानचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना, तिच्या पदार्पणासाठी देणार पार्टी

googlenewsNext
ठळक मुद्देसाराचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना साराचे 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण साराच्या अभिनयाचे होतेय खूप कौतूक

अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. इतकेच नाही तर सैफ अली खान व करीना कपूरदेखील तिचा अभिनय पाहून थक्क झाले आहेत. त्यामुळे करीना तिच्या परफॉर्मन्ससाठी पार्टीचे आयोजन करते आहे. या पार्टीमध्ये सारा व सैफच्या जवळचे व्यक्ती सहभागी होणार आहेत.


'केदारनाथ' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात साराने मुक्कू नामक मुलीची भूमिका केली आहे. या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. इतकेच नाही तर सैफ व करीना दोघांना चित्रपट खूपच आवडला आहे. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने सारासाठी पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमध्ये सारा व सैफच्या जवळचे मित्रमंडळींना बोलवण्यात येणार आहे.


सारा व सैफ नुकतेच करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये आले होते. त्यावेळी साराने करीना व सैफच्या लग्नाबद्दलही बातचीत केली. साराने सांगितले की कशापद्धतीने तिची आई अमृताने तिला करीना व सैफच्या लग्नासाठी तयार केले होते. तसेच तिने हेही सांगितले की करीनासोबत लग्न करायच्या आधी सैफने अमृता सिंगला पत्र लिहिले होते. 


केदारनाथ चित्रपटात सारा अली खानसोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सारा केदारनाथनंतर रोहित शेट्टीचा चित्रपट सिंबामध्ये रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.

Web Title: Kareena Kapoor impressed by Sara Ali khan debut acting, kareena gives party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.