करणजीत कौर ते सनी लिओनी! पाहा, ४० सेकंदाचा टीजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 09:58 AM2018-07-02T09:58:47+5:302018-07-02T09:59:18+5:30

 नावावर कुठलाही हिट चित्रपट नाही, त्यातचं अतिशय सुमार अभिनय, त्यामुळे सनीची चर्चा व्हायचे तसे कारण नव्हते. पण तरिही ती चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे, पॉर्न स्टार ही तिची एकेकाळची ओळख. 

 Karanjeet Kaur to Sunny Leone , See, teaser of biopic of sunny leone | करणजीत कौर ते सनी लिओनी! पाहा, ४० सेकंदाचा टीजर!!

करणजीत कौर ते सनी लिओनी! पाहा, ४० सेकंदाचा टीजर!!

googlenewsNext

सनी लिओनी ही एकेकाळची पॉर्न स्टार ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक बनून आली आणि बॉलिवूडची कवाडं तिच्यासाठी उघडली गेलीत. याच घरात महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म2’ची आॅफर दिली होती. पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली. गेल्या काही वर्षांत भारतात आपली इतकी चर्चा होईल, असे खुद्द सनीलाही वाटले नसेल. अर्थात ही चर्चा सनीच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची वा तिच्या सुपरडुपर हिट चित्रपटाची नसून, तिच्या पूर्वायुष्याबदद्लचं अधिक होती. नावावर कुठलाही हिट चित्रपट नाही, त्यातचं अतिशय सुमार अभिनय, त्यामुळे सनीची चर्चा व्हायचे तसे कारण नव्हते. पण तरिही ती चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे, पॉर्न स्टार ही तिची एकेकाळची ओळख. आता तिची ही ओळख जगासमोर आणण्याची तयारी सुरू आहे. होय, येत्या १५ जुलैला सनी लिओनीचे बायोपिक रिलीज होत आहे.
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास सनीसाठी खचितचं सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये येण्याआधी पॉर्न स्टार ही तिची ओळख बनली होती. ही ओळख पुसण्याचे सनीने बरेच प्रयत्न केलेत. सनीचे खरे नाव करणजीत कौर. ही करणजीत सनी कशी बनली, हा प्रवास या बायोपिकमध्ये असणार आहे. ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’ असे तिच्या या बायोपिकचे नाव आहे. ही एक वेबसीरिज आहे.


 या बायोपिकचा टीजर रिलीज झाला आहे. सुमारे ४० सेकंदाच्या या टीजरमध्ये सनी लिओनीच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू दाखवण्यात आले आहे. सनीने या टीजरचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरही शेअर केला आहे. ‘माझे आयुष्य लवकरच जगापुढे उघड होईल,’असे तिने लिहिले आहे.
सनीच्या या बायोपिकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आता तिचे हे बायोपिक पाहून लोकांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, ते बघूच.

 

Web Title:  Karanjeet Kaur to Sunny Leone , See, teaser of biopic of sunny leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.