‘तख्त’ने केला सिद्धार्थ मल्होत्राचा हिरमोड, गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:11 PM2018-08-30T12:11:22+5:302018-08-30T12:11:34+5:30

बॉलिवूडची अतिशय आदर्श मानली जाणारी गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर आहे. होय, आम्ही बोलतोय ते करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दल. 

karan siddharth friendship is on the verge of breaking | ‘तख्त’ने केला सिद्धार्थ मल्होत्राचा हिरमोड, गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर!!

‘तख्त’ने केला सिद्धार्थ मल्होत्राचा हिरमोड, गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर!!

googlenewsNext

बॉलिवूडची अतिशय आदर्श मानली जाणारी गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर आहे. होय, आम्ही बोलतोय ते करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दल. सूत्रांचे मानाल तर दोघांचेही संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. करणच्या मनातली ‘स्टुडंट’ सिद्धार्थबद्दलची सगळी ‘मोह-माया’ संपुष्टात आल्याचे कळतेय. अर्थात यामागे काही कारणं आहेत. यात पर्सनल लाईफपासून करिअरच्या निर्णयापर्यंतच्या कारणांचा समावेश असल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल, करणच्या पंखाखालून निघून आपला मार्ग शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तूर्तास सिद्धार्थ स्वत:साठी नव्या एजन्सीच्या शोधात आहे. जेणेकरून या एजन्सी त्याचे प्रोफेशनल काम बघतील. आत्तापर्यंत करण, आलिया, वरूण, जान्हवी कपूर तसेच धर्मा प्रॉडक्शनच्या सर्व कलाकार- दिग्दर्शकांचे काम पाहणारी एजन्सीचं सिद्धार्थचे काम पाहत होती. पण गेल्या दोन वर्षांत सिद्धार्थच्या करिअरचा ग्राफ वेगाने खाली आला. यामुळे सिद्धार्थने एकट्याने हातपाय हलवणे सुरु केले आहे. करण यामुळे नाराज असल्याचे कळतेय. केवळ इतकेच नाही तर आलिया भट्टसोबतच्या ब्रेकअपनंतर करणही सिद्धाथपासून दुरावलाय. इतके सगळे असूनही करणवर सिद्धार्थ विश्वास होता. पण दोन आठवड्यांपूर्वी करणने ‘तख्त’ची घोषणा केली आणि सिद्धार्थचा पुरता हिरमोड झाला. करणने यात अनिल कपूर, करिना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, भूमी पेडनेकर अशा सगळ्यांना घेतले. पण तो सिद्धार्थला विसरला. करिअरच्या इतक्या वाईट काळात करणची सोबत मिळेल, असे सिद्धार्थला वाटले होते. पण असे न झाल्याने सिद्धार्थनेही धर्मा प्रॉडक्शनपासून वेगळे होऊन स्वत:चा मार्ग तयार करण्याचे ठरवले. सूत्रांचे मानाल तर कारगील शहीद कॅप्टन विक्रम बत्राचे बायोपिक हा करणच्या कंपनीसोबत सिद्धार्थचा कदाचित अखेरचा प्रोजेक्ट असू शकतो.
तूर्तास आलिया भट्ट रणबीर कपूरला डेट करतेय तर सिद्धार्थचे नाव अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत
जोडले जातेय.

 

Web Title: karan siddharth friendship is on the verge of breaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.