Karan Johar's 'tweet' led him to ask for apology | करण जोहरच्या 'त्या' ट्वीटमुळे त्याला मागवी लागली माफी

बॉलिवूड स्टार अक्षय कुमाराचा आगामी चित्रपट केसरीमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा त्याच्या अपोझिट लीड रोलमध्ये दिसणार आहे. करण जोहरने धर्मा प्रो़क्शनच्या तयार होणाऱ्या या चित्रपटातील लीड एक्ट्रेसच्या नावाची घोषणा बुधवारी केली होती. या चित्रपट अक्षयच्या पत्नी भूमिका परिणीती चोप्रा साकरणार असल्याची घोषणा त्यांने ट्विटरवर केली खरी. मात्र हे करताना करणने एक चूक केली आणि मग ट्विटकरांनी त्याला ट्रोल केले. त्याचे झाले असे की परिणीतीचे नाव घेऊन करणने अक्षयाचाच केसरीमधील फोटो लावला. त्यामुळे काही वेळे सगळेच क्नफ्यूज झाले. करणची ही चूक लक्षात येताच सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. यानंतर करणने आपल्या चुकीसाठी माफी मागली. पुन्हा करणने नवे ट्विट करुन आपली चूक सुधारली.  करण जोहर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो आपल्या चाहत्यांशी तो सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चित्रपटांबद्दलची माहिती आपली एखाद्या गोष्टीवरील मतं तो बिनधास्तपणे नोंदवत असतो.  मात्र यावेळी त्याचेच ट्वीट त्याला महाग पडले.  

ALSO READ :  OMG! ​कंगना राणौतने पुन्हा डिवचले; म्हणे, ‘करण जोहर मेहमानों को जहर पिलाता है, मुझसे पुछो ’!!

‘केसरी’चे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले असल्याचे कळते. ही लढाई ‘बॅटल आॅफ सारागढी’ नावाने ओळखले जाते. .  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  याच लढाईवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ‘बॅटल आॅफ सारागढी’  हा चित्रपट साकारत आहेत.  या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे.  ‘पॅडमॅन’ व ‘केसरी’ शिवाय अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा सिनेमाही याचवर्षी रिलीज होणार आहे.

मध्यतंरी या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र ऐनवेली परिणीतीने बाजी मारली. परिणीती पहिल्यांदाच अक्षय सोबत स्क्रिन शेअर करते आहे. त्यामुळे 2018मध्ये प्रेक्षकांना एक नवी जोडी पडद्यावर पाहायला मिळाणार आहे. प्रेक्षकांना या जोडीची केमिस्ट्री किती आवडते हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. 
 
Web Title: Karan Johar's 'tweet' led him to ask for apology
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.