Karan Johar's special planning for Sarah Ali Khan; Read the whole news! | ​सारा अली खानसाठी करण जोहरचे विशेष प्लानिंग; वाचा संपूर्ण बातमी!

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही ‘केदारनाथ’मधून बॉलिवूड डेब्यू करतेयं, हे तुम्हाला ठाऊक आहेच. खरे तर सारा अली खान करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार, अशीच चर्चा होती आणि ही चर्चा खरीही होती. करण जोहर साराला त्याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत लॉन्च करणार होता. त्याने सैफला तसे वचनही दिले होते. पण करण एक चांगला प्रोजेक्ट डिझाईन करण्याआधीच साराने वेगळा निर्णय घेतला. करणच्या काही गोष्टी प्लानिंगनुसार झाल्या नाहीत आणि साराने अभिषेक कपूरचा ‘केदारनाथ’ साईन केला. यानंतर करण जान्हवी कपूरच्या डेब्यू चित्रपटात बिझी झाला. साराने ‘केदारनाथ’ साईन केला तेव्हा करण जोहर नाराज झाल्याचीही चर्चा होती. पण कदाचित ही नाराजी आता मिटलीयं किंवा कदाचित करण सैफला दिलेले वचन विसरला नाहीय. त्यामुळेच करण सारासाठी दुसरा चित्रपट बनवण्यास तयार आहे. म्हणजेच,  सगळे काही ठीक झालेच तर सारा करणसोबत आपला दुसरा चित्रपट साईन करेल.
 सध्या सारा याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ‘केदारनाथ’मध्ये सारा सुशांत सिंह राजपूतसोब तआॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. मध्यंतरी सुशांतच्या क्षणा-क्षणाला बदलणा-या मूडमुळे म्हणजेच मूड स्विंगमुळे ‘केदारनाथ’च्या शूटींगचा खोळंबा होऊ लागल्याची चर्चा होती.   या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘केदारनाथ’च्या शूटींगचे दुसरे शेड्यूल मेकर्सला सुरुवात करायचे होते. पण ते आता लांबलेय. दुस-या शेड्यूलची सगळी तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी सुशांतने पुन्हा तारखांची अदलाबदल केली. त्यामुळे ‘केदारनाथ’ची रिलीज डेट पुढील वर्षाच्या अखेरिसपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याची खबर आहे.

ALSO READ : सारा अली खानला वाटू लागलीय जान्हवी कपूरची भीती? वाचा सविस्तर...

‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एका अतिशय साध्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रत्यक्षात सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विसंगत असणार आहे. 
Web Title: Karan Johar's special planning for Sarah Ali Khan; Read the whole news!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.