Karan Johar will take a year's bakery; But why? | ​करण जोहर घेणार एक वर्षाचा बेक्र; पण का?

करण जोहर गेल्या वर्षभरात प्रचंड बिझी आहे. पण इथून पुढे वर्षभर करण तेवढाच निवांत असणार आहे. होय, करण चित्रपटांपासून एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. या वर्षभरात करण ना कुठल्या नव्या चित्रपटावर काम करणार, ना कुठल्या स्क्रिप्टवर फोकस करणार. आता करण इतका मोठा ब्रेक का घेतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आपल्या दोन्ही मुलांसाठी.होय, यश व रूही या आपल्या दोन्ही मुलांसोबत करणला वेळ घालवायचा आहे. पण करण इतका बिझी आहे की, त्याला ते शक्य होत नाहीये. खरे तर करण दोन मुलांचा बाप झाला, त्याक्षणीच तो काही काळ ब्रेक घेईल, असे सर्वांना वाटले होते. पण कामाच्या दबावामुळे करणला त्यावेळी ब्रेक घेणे शक्य झाले नाही. पण आता रूही व यश दोघेही वर्षभराचे झाले आहेत. आता ते करणला पापा म्हणून ओळखू लागले आहेत. करणच्या मते, ब्रेक घेण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे येत्या वर्षभर करणचा संपूर्ण वेळ हा केवळ आणि केवळ त्याच्या मुलांचा असेल. अन्य कुठलाही नवा प्रोजेक्ट तो या काळात हाती घेणार नाही. अर्थात तूर्तास हातात असलेल्या प्रोजेक्टवरचे त्याचे काम सुरू राहील. करणच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली येत्या काळात तीन मोठे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात पहिला सर्वात मोठा चित्रपट आहे, ‘धडक’. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर हे दोघे या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करताहेत. याशिवाय अक्षय कुमार व परिणीती चोप्रा स्टारर ‘केसरी’ हाही करणचाच प्रोजेक्ट आहे. याशिवाय रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ हा चित्रपटही करण प्रोड्यूस करतो आहे.

ALSO READ : ​करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले महाग! ‘साहो’ अडचणीत!!

गतवर्षी करणने सरोगसीद्वारे  जुळ्या मुलांना जन्म दिला होता.   सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे करणने जाहीर केले होते. मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.   माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांना प्रवेश केला आहे.  वयाच्या ४४ वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो. हे माझे सगळ्यांत मोठे ब्लॉकबस्टर आहे. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या होत्या.
 

Web Title: Karan Johar will take a year's bakery; But why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.