करण जोहरला करायचंय 'या' अभिनेत्रींसह काम, त्यासाठी करतोय इतका खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:18 PM2019-04-09T14:18:23+5:302019-04-09T14:20:33+5:30

नेपोटीझमच्या मुद्द्यावरून कंगनाला करणनं हिणवले होते.

Karan Johar wants to work with Kangana Ranaut | करण जोहरला करायचंय 'या' अभिनेत्रींसह काम, त्यासाठी करतोय इतका खटाटोप

करण जोहरला करायचंय 'या' अभिनेत्रींसह काम, त्यासाठी करतोय इतका खटाटोप

googlenewsNext

बॉलीवुड आणि आणि कलाकरांचे आपापसात होणारे कोल्डवॉर हे समीकरण तसं जुनंच... दरवेळी कोणत्या ना कोणत्या  कारणांमुळे वाद रंगतं  असतात. असाच काहीसा वाद करण जोहर आणि कंगनामध्ये रंगला होता. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नेपोटीझमच्या मुद्द्यावरून कंगनाला करणनं हिणवले होते. यावर कंगणानेही शांत न राहता करणचाही चांगलाच पाणऊतारा केला होता. मात्र आता अचानक करणला कंगणाचा पुळका आला आहे. आता तो कंगणाचे गोडवे गाताना दिसतोय.

कंगणाविषयी करणचाहा बदलेला अॅटीट्युड कंगणालाही फारसा पचला नसावा.  करणला कंगणाबरोबर चक्क काम करण्याची संधी हवी असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो प्रत्येक कार्यक्रमात कंगणाचे कौतुक करताना पाहायला मिळतोय. करणने कंगणासमोर पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला असला तरी कंगणालाही करणविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे का हे पाहणे रंजक ठरणार असून तसेच आगामी काळात कंगणा करणच्या सिनेमात झळकल्यास आश्चर्य वाटु नये. वाद क्षमवण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं आहे.  

करणमध्ये आलेला हा बदल फक्त कंगणाबद्दल नाहीतर सिनेरसिकांकडे पाहण्याचाही त्याचा अॅटीट्युड बदलला आहे.   सोशल मीडियावर करणाला प्रचंड ट्रोल केले जायचे. आधी या टीकेमुुळे  त्याला खूप  वाईट वाटायचे. संताप यायचा. पण यानंतर अशी एक वेळ आली की,  त्याने या सगळ्या गोष्टींनी इग्नोर केले.  आता  ट्रोलर्सच्या टीकेमुळे अस्वस्थ होत नाही तर उलट या टीकेमुळे माझे मनोरंजन होत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. रोज सकाळी मी उठतो आणि शिव्या खातो, मग हसतो. तुम्हाला माझ्या सेक्सुअ‍ॅलिटीबद्दल जे बोलायचे ते बोला. जितक्या शिव्या द्यायच्या त्या द्या. मला याने काहीही फरक पडत नाही. माझ्या मते, या शिव्या देणाऱ्यांचा मेंदू आजारी आहे. मी त्यावर काय बोलणार, असे करण यावेळी म्हणाला होता.
 

Web Title: Karan Johar wants to work with Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.