करण जोहरने सुनावले, एक-दोन सिनेमे हिट झाले की, तरूणांच्या डोक्यात हवा जाते!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:58 PM2018-12-14T13:58:28+5:302018-12-14T14:00:25+5:30

करणने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर अशा अनेकांना करणने ओळख दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पण आता बॉलिवूडमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांबद्दल करण जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Karan Johar takes a jibe at young actors, says some have ‘swollen ego’, others are ‘delusional’ | करण जोहरने सुनावले, एक-दोन सिनेमे हिट झाले की, तरूणांच्या डोक्यात हवा जाते!

करण जोहरने सुनावले, एक-दोन सिनेमे हिट झाले की, तरूणांच्या डोक्यात हवा जाते!

googlenewsNext
ठळक मुद्देतुमचे एक-दोन चित्रपट गाजले की अनेक जण स्वत:ला सुपरस्टार मानू लागतात.  काही कलाकारांच्या मेकअपचाच खर्च दिवसाला एक लाख रुपये इतका असतो. अशी लोकं खरंच वेडी असतात. दोन चार चित्रपट हिट झाले ना झालेत, त्यांचा तोरा वाढतो. ते भ्रमात वावरू लागतात, असे करण म्हणाला.

 बॉलिवूड इंडस्ट्रीतील भल्या-बुºया गोष्टींवर बोलणा-यांपैकी एक म्हणजे करण जोहर. करणने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर अशा अनेकांना करणने ओळख दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पण आता बॉलिवूडमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांबद्दल करण जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. होय, अलीकडे एका मुलाखतीत करणने बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांबद्दल अगदी परखड मत मांडले. होय, एक दोन सिनेमे गाजले ना गाजले की, तरूण कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. त्यांचा अहंकार वाढतो, असे करण यावेळी म्हणाला. केवळ इतकेच नाही, तर हा एकप्रकारचा आजार आहे आणि हा आजार इंडस्ट्रीत वेगाने फोफावतो आहे, असेही तो म्हणाला.  

बॉक्स आॅफीसवर तुमचे एक-दोन चित्रपट गाजले की अनेक जण स्वत:ला सुपरस्टार मानू लागतात.  काही कलाकारांच्या मेकअपचाच खर्च दिवसाला एक लाख रुपये इतका असतो. अशी लोकं खरंच वेडी असतात. दोन चार चित्रपट हिट झाले ना झालेत, त्यांचा तोरा वाढतो. ते भ्रमात वावरू लागतात, असे करण म्हणाला.


 या मुलाखतीत करणने सेलिब्रिटींच्या मॅनेजरलाही टोला लगावला. ही इंडस्ट्री कशी चालते हे काही सेलिब्रिटी मॅनेजरला ठाऊक नाही. अभिनेत्यांचा एखादा चित्रपट बॉक्स आॅफीसवर हिट झाला, काही कार्यक्रम आणि लग्नात हजेरी लावली, हजारांची गर्दी जमू लागली की, मॅनेजर अभिनेत्यांची फी वाढवतात, असा टोमणा त्याने हाणला. विशेष म्हणजे, हे स्टार कोण हेही त्याने सांगितले. मुलाखतीअखेर त्याने राजकुमार राव, आयुषमान खुराना आणि विकी कौशल या अभिनेत्यांची नावे घेतली.
गत वर्षभरात राजकुमार, आयुष्यमान व विकीच्या चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली.  राजकुमारचा ‘स्त्री’, आयुषमानचा ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’, विकी कौशलचा ‘राजी’ हे चित्रपट हिट झालेत.  

Web Title: Karan Johar takes a jibe at young actors, says some have ‘swollen ego’, others are ‘delusional’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.