कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:10 PM2018-09-06T15:10:01+5:302018-09-06T15:11:46+5:30

समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयालयाने दिला आहे. बॉलिवूडनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे.

karan johar reaction on sc verdict section 377 homesexuality other celebs reaction | कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!!

कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!!

googlenewsNext

समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयालयाने दिला आहे. या निकालामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द झालं. हे कलम म्हणजे मनमानीपणा असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. या ऐतिहासिक निर्णयाचं अनेक स्तरातून स्वागत होत आहे. विशेषत: बॉलिवूडनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. विशेषत: दिग्दर्शक व निर्माता करण जोहर याबाबतीत आघाडीवर राहिल. केवळ करणचं नाही तर करणची निर्मिती कंपनी धर्मा प्रॉडक्शननेही ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाचं स्वागत केलं. 



आज सर्वोच्च न्यायालयाने केवळ एक ऐतिहासिक निर्णयचं दिला नाही तर देशातील सर्वोत्तम प्रतिक्रिया रचली, असं ट्विट धर्मा प्रॉडक्शनने केलं आहे.

‘ऐतिहासिक निर्णय़ आज मला अभिमान वाटतोय. समलैंगिकतेला गुन्हा न मानता कलम 377 संपुष्टात आणण मानवतेचा एक मोठा विजय आहे. देशाला आॅक्सिजन मिळाला,’असं करणने लिहिलं आहे. करण जोहरच्या सेक्शुअल स्टेटसवर पूर्वापार प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. अर्थात करण यावर कधीही खुलेपणानं बोलला नाही. पण आपल्या बायोग्राफीत, तो यावर बोलला होता. माझी सेक्युअ‍ॅलिटी काय आहे, हे सगळ्यांनाचं ठाऊक आहे. पण मी स्वत: ते जाहिरपणे सांगू शकत नाही. कारण असं केल्यास मी ज्या देशात राहतो, तिथे मला तुरुंगातही जावं लागू शकतं, असं करणने यात म्हटलं आहे.


सोनम कपूरनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. हाच तो भारत आहे, जिथं मला राहायचं आहे, असे तिने लिहिलं आहे.


कोंकणा सेनगुप्ता हिने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आम्ही जिंकलोत. सर्वोच्च न्यायालयाचे आभार...असं तिने लिहिले आहे.




फरहान अख्तरने, ‘बाय बाय 377... थँक्यू सुप्रीम कोर्ट,’ असं ट्विट केलं आहे.

Web Title: karan johar reaction on sc verdict section 377 homesexuality other celebs reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.