Karan Johar likes to sit on the other side! The mess on the set !! | ​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच हट्ट! सेटवर घातला गोंधळ!!

चाहत्यांचे  प्रेम कुण्या बॉलिवूड सेलिब्रिटीला नको असेल? किंबहुना चाहत्यांच्या प्रेमासाठी सेलिब्रिटी कायम आसुसलेले असतात. पण यातीलच काही अतिउत्साही चाहते मात्र सेलिब्रिटींच्या नाकात दम आणतात. या चाहत्यांमुळे सेलिब्रिटींना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. याचे अनेक किस्से तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील. ताजा किस्साही यातलाच. होय, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता करण जोहर काहीशा अशाच मनस्तापाला सामोरे जावे लागले. एका हट्टी चाहतीने करणला चांगलेच जेरीस आणले.
हा किस्सा आहे ‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’च्या सेटवरचा. करण ‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’च्या शूटींगमध्ये व्यस्त होता. त्याच्यासोबत रोहित शेट्टी, सोनाक्षी सिन्हाही होते. याचदरम्यान करणची एक चाहती अचानक सेटवर पोहोचली आणि करणला भेटायचे म्हणून अडून बसली. करण शूटींगमध्ये व्यस्त आहे, हे तिला अनेक प्रकारे समजवण्यात आले. पण ती चाहती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. याचदरम्यान मला एकदा करणला स्पर्श करायचाय, म्हणून तिने गोंधळ घालणे सुरू केले. सेटवर असलेल्या संपूर्ण टीमने तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. पण हे पाहून ती आणखीच गोंधळ घालू लागली. करण दुरून हे सगळे बघत होता. पण   प्रकरण अचानक गंभीर झाले. मी आता बेशुद्ध पडेल, असे काहीतरी ती चाहती बोलू लागली. यास्थितीत त्या चाहतीचा सामना करणेच करणने योग्य समजले. मग काय, शूटींग बाजूला ठेवून तो त्या चाहतीला भेटला. 
या क्रेझी चाहतीला भेटून करणला काय वाटले, हे ठाऊक नाही. पण ती चाहती मात्र करणला भेटून चांगलीच सुखावली.

ALSO READ : ​कोण आहे करण जोहरचा ‘व्हॅलेन्टाईन’? करणने स्वत:च केला खुलासा!

सध्या करण अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.  करणच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अनेक चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात ‘धडक’, ‘ब्रह्मास्त्र’,  ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’,‘राजी’,‘सिम्बा’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
Web Title: Karan Johar likes to sit on the other side! The mess on the set !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.