Karan Johar has set a staggering set of Rs 15 crores for the film | करण जोहरने कलंक चित्रपटासाठी तयार केला तब्बल 15 कोटींचा सेट

करण जोहरचा आगामी चित्रपट 'कलंक'ची घोषणा झाल्यापासून तो या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. ऐवढे तर नक्की आहे हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या सर्वोत्तम चित्रपटापैकी एक असणार आहे. एक वृत्त पत्राच्या रिपोर्टनुसार करण जोहरने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 15 कोटींचा सेट तयार केला आहे. रिपोर्टनुसार मुंबईतल्या गोरगावमध्ये फिल्म सिटीमध्ये एक भव्यदिव्य सेट तयार करण्यात आला आहे. ज्याच्या बाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याला कारण सेटचे फोटो लीक होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  करणने जुन्या दिल्लीचा सेट उभारण्यासाठी 15 कोटींचा खर्च केला आहे. करणने सेटचे डिझाइन आणि स्ट्रक्चर बनवण्यासाठी प्रॉडक्शन डिझायनर अमृता महलची मदत घेतली आहे. रिपोर्टनुसार जुन्या दिल्लीतील परिसर तयार करण्यात आला आहे. कारण कलंक हा चित्रपट देशाच्या फाळणीवर आधारित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कलंक हा चित्रपट करणचे वडिल यश जोहर यांचे स्वप्न होते त्यामुळे करण हा चित्रपट भव्य दिव्यतेने कॅन्सावर उतरवायचा आहे.   

ALSO READ :  मादाम तुसा म्युझियममध्ये लागणार करण जोहरचा पुतळा

करण जोहर , साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल. जवळपास  21 वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा एका चित्रपटा दिसणार आहेत.  संजय दत्तने कलंक चित्रपटात काम करण्यासाठी एकच अट ठेवली आहे की तो माधुरीसोबत चित्रपटात एकाही सीनमध्ये एकत्र शूटिंग करणार नाही. 
Web Title: Karan Johar has set a staggering set of Rs 15 crores for the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.