करण जोहर म्हणतो, हे आहेत बॉलिवूडचे ब्लॉकबस्टर कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:42 AM2018-09-27T11:42:34+5:302018-09-27T11:46:38+5:30

बॉलिवूडसाठी वर्ष 2018  हे एका पेक्षा एक सर्वोत्तम सिनेमांसाठी ओळखले जाणार आहे.

karan johar has revealed these are the biggest blockbuster ever shah rukh aamir ranveer singh and ranbir | करण जोहर म्हणतो, हे आहेत बॉलिवूडचे ब्लॉकबस्टर कलाकार

करण जोहर म्हणतो, हे आहेत बॉलिवूडचे ब्लॉकबस्टर कलाकार

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडसाठी वर्ष 2018  हे एका पेक्षा एक सर्वोत्तम सिनेमांसाठी ओळखले जाणार आहे. आतापर्यंत काही शानदार सिनेमा रिलीज झाले आहेत, तर आगामी काळात आणखी काही सिनेमे बॉक्सऑफिसवर झळकणार आहेत. आगामी सिनेमासंदर्भातच दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध तारे-तारका दिसत आहेत. आगामी काळात या कलाकार मंडळींचे सिनेमे ब्लॉकबस्टर होण्याची शक्यताही करणनं वर्तवली आहे.  

करण जोहरनंशाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्टसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटो शेअर करताना त्यानं 'The biggest BLOCKBUSTER ever!!!!!.' असे कॅप्शन दिले आहे.  यावरुन करण जोहरला नेमके काय सुचवायचंय हे तुम्हाला समजलं असेलच.

शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ''झीरो'' या वर्षअखेरीस बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. तर दुसरीकडे, दिवाळीमध्ये म्हणजे 8 नोव्हेंबरला आमिर खानचा 'ठग्‍स ऑफ‍ हिंदुस्‍तान' सिनेमा रिलीज होणार आहे. यासोबतच रणवीर सिंह ''सिम्बा'' आणि रणबीर कपूरचा ''ब्रह्मास्त्र''ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: karan johar has revealed these are the biggest blockbuster ever shah rukh aamir ranveer singh and ranbir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.